Wednesday 22 July 2020

28 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज --जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती


      जालना दि. 21 (जिमाका) :- जालना  शहरातील पानीवेस-2, अयोध्यानगर-2, वाढकेश्वर मंदीर परिसर-1, खडकपुरा -1, कन्हैयानगर-1,पुष्पकनगर – 1, राज्य राखीव पोलीस बल गटातील जवान-1, संभाजीनगर -10, काद्राबाद -2, लक्कडकोट -1, क्रांतीनगर -1, चंदनझिरा -1, कसबा-1, इतवार मोहल्ला -2,पिरकल्याण ता. जालना 1 अशा एकूण 28 रुग्णास जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकाही रुग्णांचा स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.   
        जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-6466 असुन  सध्या रुग्णालयात-508 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-2543, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-272, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-9655 एवढी आहे.  प्रयोगशाळेकडून अनिर्णीत नमुने-9,दैनिक पॉझिटीव्ह नमुने00 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -1548 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-7599,रिजेक्टेड नमुने-39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-423 एकुण प्रलंबित नमुने-460,यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या - 1987

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-53, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती1849 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-00, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-808, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-48, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-508आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-24, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-28, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-940, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-512 तर संदर्भित (रेफर) केलेली रुग्ण संख्या-40, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-20147 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या-56 एवढी आहे.

         जालना  शहरातील संभाजीनगर परिसरातील रहिवासी असलेला 69 वर्षीय पुरुष रुग्णास ॲनेमिया व न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दि. 2 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना दि. 4 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच दि. 22 जुलै 2020 रोजी सकाळी 7.30 वाजता त्यांचा मृत्यु झाला. तसेच जालना शहरातील विणकर कॉलनी परिसरातील रहिवासी असलेल्या 73 वर्षीय पुरुष रुग्णास न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे दि. 19 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना दि. 21 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच दि. 21 जुलै 2020 रोजी  सायंकाळी 4.10 वाजता त्यांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
        आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 808 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे  :- पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-102शासकीय मुलींचे वसतिगृह, मोतीबाग जालना-31, वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह-166, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना-80,मुलींचे शासकीय तंत्रनिकेतन वसतीगृह-44,गुरुगणेश भवन-1, जे. . एस. मुलांचे वसतिगृह-42, जे. . एस. मुलींचे वसतिगृह-69, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स डी ब्लॉक-34, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स बी ब्लॉक-12,राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स ए ब्लॉक-41, शासकीय मुलींचे वसतीगृह,अंबड-45, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-26, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह, घनसावंगी -7, शासकीय मुलींचे वसतिगृह भोकरदन-3, शासकीय मुलांचे वसतीगृह, भोकरदन-62, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र.2 भोकरदन-23, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -14. हिंदुस्थान मंगल कार्यालया जाफ्राबाद -6
   लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागामार्फत कारवाई करण्यात येत असुन
188 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 1021 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 878 वाहने जप्त,आय. पी. सी. 188 प्रमाणे मा. न्यायालयाने ठोठावलेला दंड 99  हजार 600,  मुद्देमाल जप्त 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली  6 लाख 12 हजार 530 असा एकुण 7 लाख 38 हजार 938 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.   
-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment