Friday 10 July 2020

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 ऑनलाईन तक्रार नोंदवलेल्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे बँकेत जमा करावीत


                 
            जालना, दि. 10 -  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारी नोंदविलेल्या आहेत. अशा तक्रारीसंदर्भात बँक शाखा स्तरावर शेतकऱ्यांकडून आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध करुन घेण्याचे काम सुरु आहे.  ज्या शेतकऱ्यांनी योजनेंतर्गत ऑनलाईन तक्रार नोंदवल्या आहेत, त्यांनी त्यांचे कर्जासंबंधीचे आवश्यक कागदपत्रे जसे तक्रार नोंदविल्याची स्लीप, आधारकार्ड, बँक पासबुक, सभासद मयत असल्यास मृत्युचे प्रमाणपत्र व इतर पुरावे संबंधित बँक शाखोमध्ये प्रत्यक्ष द्यावेत जेणेकरुन तथापि, तक्रारींचा तातडीने निपटारा होऊन संबंधितास कर्जमाफीचा लाभ त्वरेने मिळेल.  तसेच ज्या शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत आपले आधार प्रमाणिकरण केलेले नाही त्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
*-*-*-*-*-*-*

No comments:

Post a Comment