Thursday 30 July 2020

जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आदेश जारी



जालना, दि. 30 - कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात विविध प्रतिबंधात्‍मक उपाययोजना करण्‍यात येत आहे. त्‍यानुषंगाने शासनाने संपूर्ण राज्‍यात लॉकडाऊन दिनांक ३१ऑगस्ट, २०२० रोजीच्‍या मध्‍यरात्री पर्यंत वाढविला आहे. तसेच लॉकडाऊन मधील निर्बंधांची सुलभता आणि लॉकडाउन टप्पानिहाय उघडणे (Easing of restrictions and phase-wise opening of lockdown-Mission Begin Again) बाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्‍या आहेत व यामध्‍ये नमुद केल्‍यानूसार स्थानिक स्थितीचा विचार करता जिल्हाधिकारी हे त्‍यांच्‍या कार्यक्षेत्रात साथीच्या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी बिगर जिवनाअवश्‍यक बाबी व नागरीकांच्‍या रहदारीवर ठराविक भागात काही उपाययोजना व आवश्यक बंधने लागू करु शकतात. त्यानुसार जिल्हा दंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना रवींद्र बिनवडे यांनी लॉकडाऊन मधील निर्बंधांची सुलभता आणि लॉकडाउन टप्पानिहायउघडणे (Easing of restrictions and phase-wise opening of lockdown-Mission Begin Again) बाबत निर्गमित केलेल्‍या सुधारीत मार्गदर्शक सूचनांच्‍या अनुषंगाने खालील प्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत.
शासनाने दिलेल्या निर्देशानुसार बिगर जिवनावश्‍यक बाबी जसे शॉपींग, मैदानी व्‍यायाम हे नागरीक वास्‍तव्‍यास असलेल्‍या परिसरातील भागापुरते मर्यादीत राहील. तसेच हे करीत असतांना मास्‍क घालणे, सोशल डिस्‍टंसिंगचे पालक करणे आणि वैयक्तिक स्‍वच्‍छता राखणे बंधनकारक राहील. परिशिष्‍ट - २ मध्‍ये नमुद बाबींकरीता व आवश्‍यक मानवतावादी कार्यासाठी वैद्यकीय कारणासह जाण्‍या-येण्‍यासाठीच परवानगी राहील. आदेशासोबत जोडलेल्‍या परिशिष्‍ट-१मध्ये नमूद केल्यानुसार कोविड व्यवस्थापनाचे राष्ट्रीय निर्देश संपूर्ण जिल्‍ह्यात पाळणे बंधनकारक राहील व याची अंमलबजावणी करण्‍याची जबाबदारी संबंधीत विभाग,कार्यालय,यंत्रणांची राहील व या आदेशासोबत जोडलेल्‍या परिशिष्‍ट-२मध्ये नमूद केल्यानुसार वेळोवेळी परवानगी दिलेल्‍या बाबी सुरू ठेवल्या जातील.पूर्वीचे सर्व आदेश या आदेशासह संरेखित केल्या जातील आणि 31 ऑगस्ट २०२० रोजीच्‍या मध्‍यरात्री पर्यंत अंमलात राहतील. प्रतिबंधित राहिलेले कामांचे निर्बंध शिथील करणे व मानक कार्यपद्धती / मार्गदर्शक तत्त्वांसह टप्प्याटप्प्याने उघडणे संदर्भात शासनाकडून सूचना प्राप्‍त झाल्‍यानंतर निर्गमित करण्‍यात येतील.
                   कूठल्याही व्यक्तींकडून या आदेशातील सूचनांचे उलल्ंघन झाल्यास त्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५१ ते ६० नुसार कारवाई केलीजाईलत्यासोबतच भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहील. तसेच अन्य कायदेशीर कारवाई देखील केली जाईल.
परिशिष्‍ट-१
कोविड-१९ च्या व्यवस्थापनासाठी निर्धारित केलेल्या राष्ट्रीय मार्गदर्शक सूचना
1)  सर्व सार्वजनिक, कामाच्या ठिकाणी व प्रवासाच्‍या वेळी फेस कव्हर घालणे अनिवार्य आहे.
2)  सार्वजनिक स्थानांवर सर्व व्यक्तींनी किमान ६ फुट (२ गज की दुरी) अंतर राखणे बंधनकारक राहील.
दुकानदारांनी ग्राहकांमध्ये योग्‍य शारीरिक अंतर सुनिश्चित करावे आणि दुकानात एकाच वेळी ५ पेक्षा अधिक व्‍यक्‍ती जमणार नाही याची दक्षता घ्‍यावी.
3)  मोठया प्रमाणावर गर्दी होणारे मोठी सार्वजनिक संमेलने, मेळावे प्रतिबंधीत राहतील.
लग्‍नासारख्‍या सार्वजनिक कार्यक्रमात अतिथींची संख्या ५०पेक्षा जास्त नसावी.
अंत्‍यविधी,  अंतिम संस्‍कार प्रसंगी २० पेक्षा जास्‍त व्‍यक्‍तींना परवानगी असणार नाही.
4) सार्वजनिक आणि कामाच्या ठिकाणी थुंकणे राज्य, स्थानिक प्राधिकरणाद्वारे कायदे, नियम किंवा नियमांनुसार विहित केलेल्या दंडास दंडनीय असेल.
5)  सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, तंबाखू इत्‍यादीचे सेवन करण्‍यास प्रतिबंधराहील.
कामाच्या ठिकाणी पाळावयाचे अतिरिक्त निर्देश:-
6)  वर्क फ्रॉम होमः- शक्‍यतोवर घरून काम करण्याची पध्‍दतीचा अवलंब करावा.
कार्यालयीन कामाच्या ठिकाणे, दुकाने, बाजारपेठ आणि औद्योगिक व व्यावसायिक आस्थापनांमध्ये शिफटनिहाय कामाजाच्‍या वेळा निश्चित कराव्‍यात.
7) तपासणी आणि स्वच्छताः- सर्व प्रवेश आणि बाहेर जाण्‍याच्‍या मार्गावर आणि सर्वसामान्य भागात थर्मल स्कॅनिंग, हँड वॉश, सॅनिटायझरची व्‍यवस्‍था करावी.
8)  वारंवार स्वच्छताः- सर्व कामाच्‍या ठिकाणाचे, सार्वजनिक सुविधांचे आणि मानवी संपर्कात येणारी सर्व ठिकाणी जसे की, दरवाजाचे हॅडल आदींचे दोन पाळया दरम्‍यान तसेच वांरवार निर्जतूकीकरण करावे.
9)  सामाजिक अंतरः- दोन पाळयांमध्‍ये सुयोग्‍य अंतर ठेवून तसेच भोजन अवकाशाची वेळ योग्‍य अंतराने ठेवून व इतर मार्गाचा वापर करून कामाच्‍या ठिकाणी कामगार,कर्मचारीमध्‍ये योग्‍य अंतर राखले जाईल याची दक्षता कामाच्या ठिकाणी प्रभारी असलेल्‍या व्‍यक्‍तींनी घ्‍यावी.
परिशिष्‍ट-२
1)       सर्व जिवनावश्‍यक शॉप्‍स ज्‍यांना या आदेशाच्‍या पूर्वी खूली राहण्‍यास परवानगी देण्‍यात आलेली आहे ती त्‍या प्रमाणेच सूरू राहतील.
2)      जिल्‍हाअंतर्गत बस वाहतूक ही आसन क्षमतेच्या कमाल ५० टक्के क्षमतेनुसार चालविण्यास परवानगी राहील. तथापी बसमध्ये योग्य शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन होण्यासह बसचे निर्जंतुकीकरण (सॅनिटायजेशन) करणे आवश्‍यक राहील.
3)      आंतरजिल्‍हा वाहतूकीचे पूर्वीप्रमाणेच नियमन राहील.
4)     सर्व बिगर जिवनावश्‍यक मार्केटस,शॉप्‍स हे सकाळी ९.०० ते सांयकाळी ७.०० पर्यंत सूरू राहतील.
5)      मॉल्‍स व मार्केट कॉमपलेक्‍स हे दिनांक ०५ ऑगस्‍ट २०२० पासून सकाळी ९.०० ते सांयकाळी ७.०० वाजेपर्यंत त्‍यातील सिनेमागृहाशिवाय सुरु राहतील. तथापी मॉल्‍समधील फुड कोर्टस,  रेस्‍टॉरंटस मधील किचन फक्‍त घरपोच वितरण सेवेसाठी सुरु राहतील. शहरी व ग्रामीण भागातील स्‍थानिक प्राधिकरण यासाठी मानक कार्यप्रणाली निश्चित करतील.
6)      खुली जागा, लॉन्स, विना वातानुकुलीत मंगल कार्यालय,हॉल,सभागृह येथे लग्‍न समारंभ पार पाडण्‍यासाठी शासनाचे दिनाकं २३ जुन २०२० रोजीचे आदेश व या कार्यालयाचे आदेश क्र.२०२०/आरबी-डेस्‍क-१/पोल-१/कावि-दिनांक २३ जुन २०२० लागू राहील.
7)     निर्बंधासह (योग्‍य शारीरिक अंतर ठेवून) बाह्य शारीरिक क्रिया (व्‍यायाम, इ.) परवानगी राहील.
8)      वर्तमानपत्रांचे मुद्रण व वितरण (होम डिलिव्हरीसह)करता येईल.
9)     शैक्षणिकसंस्‍था (विद्यापीठ / महाविद्यालय / शाळा) ची कार्यालये / कर्मचारी केवळ शिक्षकेत्‍तर उद्येशाने (only for the purpose of non-teaching activities) जसे ई-सामग्रीचा विकास, उत्‍तरपत्रीकांचे मुल्‍यांकनआणि निकाल जाहिर करण्‍यासाठी, संशोधन कर्मचारी व वैज्ञनिक  कामकाज सूरू ठेवू शकतील.
10)  केश कर्तनालय, स्‍पा, सलून, ब्‍युटी पार्लर हे राज्‍य शासनाचे आदेश दिनांक २३ जुन २०२० व या कार्यालयाचे समक्रमांकीत आदेश दिनांक २९/०६/२०२० मध्‍ये दिलेल्‍या अटी व शर्तींनूसार  सूरू ठेवता येतील.
11)   दिनांक 5 ऑगस्ट 2020 पासून गोल्फ कोर्स, आउटडोअर फायरिंग रेंज, जिम्नॅस्टिक, टेनिस, मैदानी बॅडमिंटन आणि मल्लखांब यासारख्या खेळांना योग्‍य शारीरिक अंतर आणि स्वच्छताविषयक उपायांसह परवानगी दिली जाईल. जलतरण तलाव चालवण्यास परवानगी दिली जाणार नाही.
12)  सर्व सार्वजनिक आणि वैयक्तिक वाहतुकीचे व्यवस्थापन खालीलप्रमाणे करावे: 
दुचाकी वाहने
१ +१ हेलमेट व मास्‍क सह
तीनचाकी वाहन
फक्‍त अत्‍यावश्‍यक १ + २.
चारचाकी वाहन
फक्‍त अत्‍यावश्‍यक १ + 3.
प्रवासादरम्‍यान मास्‍क वापरणे बंधनकारक राहील.
13)   काही विशिष्‍ट / सामान्‍य आदेशाद्वारे परवानगी दिलेल्‍याबाबी.
*******

No comments:

Post a Comment