Thursday 16 July 2020

भोकरदन येथील कोव्हिड केअर सेंटरला जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांची भेट सेंटरमधील एकाही व्यक्तीची तक्रार येणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश


                                                



जालना दि. 16 (जिमाका)  :-  भोकरदन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर  शासकीय मुलांचे वसतिगृह या कोव्हिड  केअर सेंटरला जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज दिनांक 16 जुलै, 2020 रोजी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी  शिवकुमार स्वामी, तहसीलदार श्री. गोरख यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
     याप्रसंगी जिल्हाधिकारी बिनवडे म्हणाले, कोव्हिड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आलेल्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा उत्तम राहील याची काळजी घ्यावी. कोव्हिड केअर सेंटर सातत्याने स्वच्छता करण्यात यावी तसेच  या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या व्यक्तींना सॅनिटायझर, मास्कचा पुरवठा करण्यात यावा. याठिकाणी दाखल करण्यात आलेल्या एकाही व्यक्तीची कुठल्याच प्रकारची तक्रार येणार नाही,याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. बिनवडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
जाफ्राबाद व भोकरदन तालुक्यातील पीक परिस्थिती पीक कर्जाचा घेतला आढावा
भोकरदन येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात जाफ्राबाद व भोकरदन तालुक्यातील पीक परिस्थिती,पर्जन्यमान तसेच पिक कर्ज वाटपाचा आढावाही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी उपस्थित अधिका-यांकडून घेत दोन्ही तालुक्यातील एकही गरजू शेतकरी पीककर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले .
जालना एमआयडीसी मधील गॅस प्लांटला भेट 
 जालना येथे असलेल्या कोव्हिड रुग्णालयासाठी लिक्विड ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात येणार असून त्या धर्तीवर जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जालना येथील एमआयडीसी मध्ये असलेल्या गॅस प्लांटला भेट देऊन पाहणी केली.
 प्लॅन्टमध्ये कशाप्रकारे गॅस तयार होतो, गॅस बनवण्यासाठी आवश्यक असणारे मटेरियल कोठून आणले जाते, त्याचा साठा कशाप्रकारे व कुठे करण्यात येतो, गॅसचे वितरण कश्या पद्धतीने करण्यात येते यासह इतर  बारीक गोष्टी भेटी दरम्यान जाणून घेतल्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, गणेश नि-हाळी आदी उपस्थित होते.      

                                                    -*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment