Thursday 16 July 2020

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त ऑनलाईन समुपदेशन व मार्गदर्शन सत्र पार



         जालना, दि. 16 (जिमाका)  :-  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना अंतर्गत दि. 15 जुलै 2020 रोजी दुपारी 4.30 वाजता कौशल्य विकास प्रशिक्षणातुन रोजगार व स्वयंरोजगाराची संधी या विषयावर ऑनलाईन  वेबिनारच्या माध्यमातुन समुपदेशन व करिअर मार्गदर्शन सत्राचे  आयोजन google meet वर Meeting URL : https://meet.google.com/riw-icok-xwg  लिंकवर आयोजीत करण्यात आले होते. या ऑनलाईन समुपदेशन व करीअर मार्गदर्शन सत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षणातुन रोजगार व स्वयंरोजगाराची संधी  यावर संचालक महाबँक रोजगार प्रशिक्षण संस्था जालना प्रदीप जोशी, व कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी जालना सु.दि. उचले, यांनी समुपदेशन व मार्गदर्शन केले.  कोरोनाच्या प्रादुर्भावाने बेरोजगारांना रोजगार व स्वयंरोजगाराचे कौशल्य प्रशिक्षण संस्था जालना येथे विविध प्रशिक्षण सत्रात तसेच त्यानंतर मिळणारे कर्ज याविषयी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शन सत्रासाठी श्री. बहुरे, श्री. बोरकर, श्री. फुले, श्री. कदरम आण्णासाहेब पाटील महामंडळाचे जिल्हा समन्वयक श्री.कोल्हे, श्री. राऊत श्री. उढाण यांनी परीश्रम घेतले. असे सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकत मार्गदर्शन केंद्र, जालना यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले.
                               -*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment