Wednesday 15 July 2020

शिक्षकांच्या पोलीसमित्र म्हणुन नियुक्त्या जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आदेश जारी



  जालना दि. 15 (जिमाका) :- राज्य शासनाने कोरोना विषाणुचा (कोव्हिड -19)  प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग  अधिनियम 1897 दि. 13 मार्च 2020 पासुन लागु करुन खंड   2 ,34 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे. त्यानुसार ये जिल्हाधिकारी यांना त्याचे कार्यक्षेत्रात कोव्हिड -19 वर नियंत्रणआणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणुन घोषित करण्यात आलेले आहेत.
          कोव्हिड -19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात विविध प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येत आहेत. सद्यस्थितीत दि. 12 जुलै 2020 रोजीपर्यंत  जालना जिल्ह्यात 1 हजार 47 कोरोना रोगाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आलेले आहेत. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव  जिल्ह्यात वाढत  असुन दिवसेंदिवस बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी जलदगतीने कामकाज करणे व विहित मुदतीत कार्यवाही होण्याच्या दृष्टीने नियोजन व संनियंत्रणसाठी पोलीस विभागाच्य सहकार्यासाठी शिक्षकांची पोलीस मित्र म्हणुन नियुक्ती करणे आवश्यकताआहे.
      जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना रवींद्र बिनवडे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005  अन्वये प्राप्त अधिकारान्वये यादीमधील  238 शिक्षकांची पोलीस स्टेशनमध्ये पुढील आदेशापर्यंत  पोलीसमित्र म्हणुन पोलिस विभागाच्या सहकार्यासाठी सेवा अधिग्रहित केली आहे. त्यांनी संबंधीत पोलीस स्टेशन अंतर्गत  त्यांचे सहकार्याने पोलीस स्टेशन हद्दीत नागरीक मास्कचा वापर करत आहेत किंवा नाही इत्यादी बाबी तपासाव्यात व तसे आढळुन न आल्यास नियमाप्रमाणे संबंधीतावर कारवाई करणे, दंड वसुल करणे इत्यादी अनुषंगिक कार्यवाही करावी.
         नियुक्त शिक्षकांनी दि. 15 जुलै2020 रोजी   दुपारी 3 वाजता नेमुण दिलेल्या पोलीस स्टेशन येथे हजर रहावे .        
        वरील आदेशाचे पालन न करणा-या व्यक्ती, अधिकारी, कर्मचारी, संस्था अथवा समुह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 आणि भा.द.वि. 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे समजण्यात येईल आणि पुढील दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी. असे निर्देश जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना रवींद्र बिनवडे यांनी दिले.
-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment