Saturday 4 July 2020

जालना नगर परिषदेच्या हद्दीमध्ये 5 जुलैच्या मध्यरात्रीपासुन संचारबंदी (लॉकडाऊन) जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आदेश जारी

 जालना, दि. 4 - जिल्‍हादंडाधिकारी तथा अध्‍यक्ष जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण, जालना रविंद्र बिनवडे यांनी फौजदारी प्रकीया संहिता १९७३ च्‍या कलम १४४ (१)(३), साथरोग अधिनियम १८९७ च्‍या कलम २ आणि आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदा २००५ च्‍या सर्व संबंधीत तरतूदी अन्‍वये प्राप्‍त अधिकारांचा वापर करून संपूर्ण जालना नगर परिषद हद्दीत (औद्योगीक वसाहत क्षेत्र वगळून) दिनांक ५ जूलै २०२० च्‍या रात्री १२.०० वाजेपासून ते दिनांक १५ जूलै २०२० च्‍या मध्‍यरात्री १२.०० वाजेपर्यंत संचारबंदी (लॉकडाऊन) लागू केले  आहे. या कालावधीत नागरीकांना घराबाहेर पडण्‍यास सक्‍त मनाई करण्‍यात आली असुन या कालावधीत खालील नियम व उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाईल.
  1. वैद्यकीय सेवा, वर्तमानपत्रे व माध्‍यमांविषयक सेवा सूरू राहतील.
  2. जालना शहरात विशेष परवानगीशिवाय कोणालाही या कालावधीत प्रवेश करता येणार नाही व शहरा बाहेरही जाता येणार नाही.
  3. सर्व शासकीय कार्यालये व केंद्र शासनाचे सर्व विभागांची कार्यालये सुरू राहतील. या कार्यालयाचे,विभागांचे कर्मचारी कार्यालयीन ओळखपत्राद्वारे शहरांतर्गत प्रवास करू शकतील.
3.अ) जालना शहरातील सर्व बॅंकेचे कर्मचारी केवळ अंतर्गत कार्यालयीन कामकाजासाठी बॅंकेचे  ओळखपत्र वापरून कामकाज करू शकतील. कोणत्‍याही ग्राहकाला बॅंकेत येण्‍यास प्रतिबंध  राहील.
  1. मा.प्रमुख जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश यांनी काढलेल्‍या आदेशाप्रमाणेच जिल्‍हा न्‍यायालयीन कर्मचारी यांना न्‍यायालयीन कामकाजासाठी परवानगी राहील.
  2. जालना शहरातील नागरीकांना इतर जिल्‍ह्यात व राज्‍यात जाण्‍यासाठी ऑनलाईन पास मिळणार नाही. तथापी वैद्यकीय कारण (Medical Emergency) किंवा अत्‍ंयविधीसाठी (death of relative) परवानगी देण्‍यात येईल. यासाठी नागरीकांनी www.covid19.mhpolice.in या संकेतस्‍थळावर अर्ज करावा.
  3. जालना शहरातील सर्व नागरीकांनी आरोग्‍य सेतू अॅप डाऊनलोड करून वापरणे बंधनकारक राहील. कोरोना विषाणूचे अनुषंगाने (ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी व श्वसनास त्रास,इ.) लक्षणे आढळून आल्‍यास सदरील अॅपमध्‍ये Self Assessment या सदराखाली आपली माहिती तात्‍काळ भरावी. तसेच वरील कालावधीत संचारबंधीचे पालन करावे.
  4. फिरते दुध विक्रेते यांच्‍या मार्फत घरपोच दुध,  दुधांची पाकीटांची विक्री, वितरण करता येईल परंतू एका ठिकाणी उभे राहून दुध विक्री करता येणार नाही. घरपोच वाटपाच्‍यावेळी कोविड-१९ च्‍या अनुषंगाने सामाजीक अंतराचे पालन करावे. तसेच घरपोच दुध विक्रीची वेळ सकाळी ७.०० ते ९.३० राहील.
  5. जार वॉटर सप्‍लायर्स यांनी पाणी जारद्वारे वाटप न करता ग्राहकांकडील उपलब्‍ध भांडयांमध्‍ये पाणी द्यावे आणि त्‍यावेळेस कोविड-१९ च्‍या अनुषंगाने सामाजीक अंतराचे पालन करावे किंवा जार वॉटर सप्‍लायर्स यांनी संपूर्ण जार ग्राहकास द्यावे व रिकामी जार परत न नेता त्‍याच जारमध्‍ये पुनर्भरणाची घरपोच सेवा द्यावी तसेच सर्व वॉटर सप्‍लायर्स कर्मचारी यांना त्‍यांचे ओळखपत्रा आधारे परवानगी राहील.
  6. घरगुती गॅस घरपोच सेवा देतांना गॅस कंपनीचा गणवेष परिधान करावा व त्‍यांचे गणवेष नसलेल्‍या कर्मचारी यांनी नियमानूसार पास काढून घरपोच सेवा द्यावी.
  7. विद्युत सेवा, मोबाईल व दुरसंचार सेवा पुरविणा-या कंपन्‍या, आस्‍थापना व त्‍यांचे कर्मचारी व वाहनांना ओळखपत्र आधारे परवानगी राहील.
  8. वैद्यकीय कर्मचारी व औषधी विक्रेते यांनी दवाखान्‍याचे ओळखपत्र किंवा ऑनलाईन पासद्वारेच जालना शहराअंतर्गत प्रवासास परवानगी देण्‍यात येत आहे.
  9. अत्‍यंविधीसाठी शासनाचे आदेशात नमुद केल्‍यानूसार नियमाप्रमाणे परवानगी असेल.
  10. सर्व प्रकारची मालवाहतूक व त्‍यानुषंगाने जालना शहराच्‍या हद्दीत गोदामे चालवण्‍यास परवागी देण्‍यात येत आहे. त्‍यानुषंगाने त्‍या आस्‍थापनांनी हमालांना ओळखपत्र उपलब्‍ध करून द्यावीत.
  11. पेट्रोल व डिझेल पंप फक्‍त अत्‍यावश्‍यक सेवा, मिडीया व वैद्यकीय सेवा देणा-या कर्मचा-यांच्‍या वाहनांना व शासकीय वाहनांनासाठीच  सूरू राहील. ओळखपत्राची पडताळणी करूनच पेट्रोल व डिझेल वितरण करण्‍यास परवानगी राहील. अपवादात्‍मक परिस्थितीत वैद्यकीय कारणास्‍तव नागरीकांना आवश्‍यक ती खातरजमा करूनच पेट्रोल व डिझेल वितरण करता येईल. पेट्रोल पंपावर काम करणा-या कर्मचा-यांना पंप चालकांनी दिलेल्‍या ओळखपत्रा आधारे परवानगी राहील.
  12. शासकीय कापूस व मका खरेदी केंद्र सूरू राहतील. यामध्‍ये काम करणारे अधिकारी,कर्मचारी,हमाल यांना संबंधीत विभागाने दिलेले ओळखपत्र आवश्‍यक राहील.
  13. अत्‍यावश्‍यक सेवेसाठी (घरपोच भाजीपाला व अत्‍यावश्‍यक औषधीसाठी) प्रभागनिहाय नेमलेल्‍या अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. (यादी सोबत जोडली आहे.)
  14. आरोग्‍य सर्वेक्षण करण्‍यासाठी नेमणूक केलेल्‍या आरोग्‍य कर्मचारी,आरोग्‍य सेवीका,आशा कर्मचारी, अंगणवाडी सेवीका यांना सर्वेक्षणाचे काम करण्‍यासाठी ओळखपत्रा आधारे अनुज्ञेयता राहील.
  15. औद्यागीक वसाहत मधील कारखान्‍यांमध्‍ये काम करणा-या कर्मचा-यांना, व्‍यक्‍तींना ओळखपत्र देण्‍याची जबाबदारी त्‍या-त्‍या आस्‍थापनेची राहील तसेच त्‍यांची वाहतूक ठरलेल्‍या ठिकाणी करण्‍याची सोय संबंधीत कंपनीने करावी. तसेच सर्वांना कोविड-१९ चे नियम पाळणे बंधनकारक राहील.
  16. वरील १ ते १८ वरील कामांसाठी जालना शहरात येणा-या कर्मचा-यांना फक्‍त पुढील ठिकाणावरूनच (अंबड चौफुली, मंठा चौफुली, कैन्‍हयानगर टि पॉईंट, राजूर टि पॉईंट) शहरात त्‍यांच्‍या ओळखपत्रा आधारेच  प्रवेश मिळेल. कोणतीही व्‍यक्‍ती विना ओळखपत्र व वरील बाबीं व्‍यतिरिक्‍त शहरात विनाकारण फिरतांना आढळल्‍यास त्‍यांचेविरुध्‍द नियमाप्रमाणे कडक कारवाई करण्‍यात येईल.
     सदरील आदेशाची कडक अंमलबजावणी सर्व संबंधीत यंत्रणांनी करावी.  कूठल्याही व्यक्तींकडून या आदेशातील सूचनांचे उल्‍लंघन झाल्यास त्यांचेविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५१ ते ६० नुसार कारवाई केली जाईल त्यासोबतच भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहील. तसेच अन्य कायदेशीर कारवाई देखील केली जाईल.
*******
अत्‍यावश्‍यक सेवेसाठी (घरपोच भाजीपाला व अत्‍यावश्‍यक औषधीसाठी)प्रभागनिहाय नेमलेल्‍या अधिकारी
अ.क्र.
कार्यक्षेत्र
प्रभाग अधिकारी यांचे नाव व सपंर्क क्रमांक
जुना जालना – १
(मियासाहब दर्गा परिसर, मस्‍तगड, गांधी चमन, टाऊन हॉल, शनिमंदीर, कचेरी रोड, गणपती गल्‍ली, भाग्‍यनगर, संजोगनगर, रेल्‍वे स्‍टेशन, इनकमटॅक्‍स कॉलनी, नरिमन नगर, निलम नगर, मुकतेश्‍वर कॉलनी, ओम नगर,इंदरा नगर, मोती बाग परिसर, वडारवाडी परिसर,इत्‍यादी)

श्री. सॅमसंन कसबे

८२०८३९९१९१
८९८३२०१९०४

जुना जालना – २
(मस्‍तगड उजवी बाजू, शिशटेकडी, देहरकरवाडी, कसबा, माळीपूरा, शास्‍त्री मोहल्‍ला, दुखी नगर, मिलत नगर, योगेश्‍वरी कॉलनी, तुलसी पार्क, नहादी कॉलनी, मोरंडी मोहल्‍ला, कैकाडी मोहल्‍ला,संजय नगर,निळकंट नगर,  कुच्‍चरवट्टा,  छत्रपती कॉलनी, जुना तहसील कार्यालय परिसर, टाऊन हॉल उजवी बाजू,इत्‍यादी)

श्री. पंडीत पवार

९९२३९६२५५५

काद्रबाद विभाग
(मंगल बजार, लोधी मोहल्‍ला, सराफा, नेहरू रोड, उडपी चौक, मोती मस्‍जीद परिसर, अलंकार टॉकीज परिसर, खडकपूरा, उतारागल्‍ली,  अबड गल्‍ली,  गुडल्‍लागल्‍ली, पोलास गल्‍ली, कुभांरगल्‍ली, पाणी वेस परिसर, जिंदल मार्केट परिसर, मॅजेस्‍टीक टॉकीज परिसर,चमडा बजार परिसर,इत्‍यादी)

श्री.सतिश पांचगे

९५७७५४३१११
९८२३३७१३७२
सदर बजार – १
(सावरकर चौक, मामा चौक, बस स्‍थानक परिसर, राऊत नगर, जुना मोंढा, गोपीकिशन नगर, देऊळगाव राजा रोड, रेहमानगंज परिसर, नाथबाबा गलली,धनगरपूरा, हमालपूरा, आर.पी.रोड, चाटे गल्‍ली, फुल बजार, फुले मार्केट परिसर, अकेली मस्‍जीद परिसर, सदर बजार पोलीस स्‍टेशन परिसर, बैतपूरा, दाना बजार, मराठा बिलडींग परिसर, महावीर चौक परिसर, सरोजीनी रोड परिसर, मा.फुलंब्रीकर नाटयगृह परिसर, महाविर मंगल कार्यालय परिसर, बन्‍सीपूरा, संग्राम नगर,इत्‍यादी)

श्री.अशोक लोंडे
९४२०४६१५२४
८७८८३९६६६२
सदर बजार – २
(विवेकानंद हॉस्‍पीटल परिसर, गोलडन जुबली शाळा परिसर, भोकरदन रोड उजवी बाजु, नवीनमोंढा, गायत्री नगर, कन्‍हैया नगर, सेंटमेरी शाळा परिसर, हनुमान घाट, मुर्गीतलाव परिसर, अमित हॉटेल परिसर, मोदीखाना, आर.पी.रोड, रेहमानगंज परिसर, वारंटवार रोड, जे.ई.एस. कॉलेज परिसर, न.प.फिल्‍टर बेड परिसर,             जुनी एम.आय.डी.सी, आर.पी.टी.एस, दुर्गा माता परिसर, मिशन हॉस्‍पीटल परिसर,  कॉलेज रोड, पेन्‍शनपुरा, आनंद नगर, डगलस शाळा परिसर,इत्‍यादी)

श्री.विलास गावंडे

७३८५२७७७७६
९७६६३११०११
सदर बजार – ३
(राम मंदीर, बडी सडक ते उडपी चौक, उडपी चौक ते छ.शिवाजी महाराज पुतळा, राम मंदीर ते राणी झांसी पुतळा परिसर, राणी झांसी पुतळा परिसर ते जिजामाता प्रवेशद्वार, जिजामाता प्रवेशद्वार ते छ.शिवाजी महाराज पुतळा परिसर, जिजामाता प्रवेशद्वार ते गुरुबचन चौक परिसर, गुरुबचन चौक ते आजाद मैदान, आजाद मैदान ते छ.शिवाजी महाराज पुतळा, करवा नगर, गुरुबचन चौक ते मंठा चौफुली, मंठा चौफुली ते इशान्‍य ग्रीन कॉलनी परिसर, प्रिती सुधा  नगर, व्‍यंकटेश नगर, मर्केडेय नगर, हनुमान मंदीर परिसर, रामनगर, ढोरपूरा, भिमनगर, गुरु गोविंदसिंग नगर, वालमीक नगर, गांधी नगर, एस.आर.पी.एफ वसाहत, म्‍हाडा कॉलनी, साईनाथ नगर, लक्ष्‍मी नगर, साई नगर, प्रियंका रेसीडेन्‍सी, सरस्‍वती मंदीर परिसर, ब्रुहान नगर, इत्‍यादी)

श्री.संजय खर्डेकर
७५८८५६१६६६
७७४४०८२६६६
नुतन वसाहत रेल्‍वे रुळापलीकडील भाग
(कांचन नगर, राहून नगर, शिवनगर, समर्थ नगर, विसावा शाळा परिसर, घाटी रोड, सामान्‍य रुगणालय परिसर, जि.प.कार्यालया मागील परिसर, सहयोग नगर, पांगरकर नगर, सोरटी नगर, महसूल कॉलनी, यशवंत नगर, माऊली नगर, योगेश नगर, अर्चना नगर, रुप नगर, सतकर नगर, म्‍हाडा कॉलनी,  इदेवाडी पाणी टाकी परिसर दोन्‍ही बाजू जालना न.प. हद्द, जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसर, सिरसवाडी रोड न.पा. हद्द पर्यंत, पोलीस कर्वाटर, मा.न्‍यायालयामागील परिसर,म्‍हाडा कॉलनी, ,इत्‍यादी)
श्री.अरुण वानखेडे
८८५७०८८३०७
८६९८४५१७७७

8
संभाजीनगर
(भोकरदनचौक ते राजुर चौफुली डावी बाजु, ढवळेश्वर, जांगळानगर, शिक्षक कॉलनी, सकलेचानगर, रतन नगर, औरंगाबाद चौफुली परिसर, नॅशनल नगर, एस.टी. वर्कशॉप परिसर, चंदनझिरा परिसर, सुंदरनगर, शासकीय तंत्रनिकेतन परिसर, नागेवाडी परिसर, पंचमुखी नगर, आयशाकिरण रेसीडेन्सी ईत्यादी
श्री राधेशाम लोखंडे
9822940050
9175041130

******* 

No comments:

Post a Comment