Wednesday 8 July 2020

ई-पास प्रणालीसाठी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक, डॉक्टरांचे कोव्हीड 19 लक्षणे नसल्याचे प्रमाणपत्र वैध




            जालना, दि. 8 -  राज्य शासनाने एका जिल्ह्यातुन दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात जाण्यासाठी ई-पास प्रणाली सुरु केलेली आहे.  या प्रणालीवर वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कोव्हीड-19 लक्षणे नसल्याबाबत वैद्यकीय प्रमाणपत्र अपलोड करावे लागते.  त्यासाठी जिल्ह्यातील नागरिक वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे गर्दी करत आहेत.  गर्दीमुळे शासनाच्या सामाजिक अंतर पाळण्याचे नियम व्यवस्थित पाळले न जाण्याची शक्यता असल्यामुळे व कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याचे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना रवींद्र बिनवडे यांनी महाराष्ट्र कोव्हीड उपाययोजना 2020, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग अधिनियम 1897 मधील तरतुदीअन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करत जालना जिल्ह्यातील कोणत्याही नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक, अधिकारी (डॉक्टर) यांनी दिलेले कोव्हीड 19 लक्षणे नसल्याबाबत चे वैद्यकीय प्रमाणपत्र हे ई-पास प्रणालीद्वारे प्रवास करण्यासाठी वैध राहणार असुन नागरिकांनी वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्दी करु नये असे एका परिपत्रकाद्वारे कळविले आहे.
*******

No comments:

Post a Comment