Thursday 2 July 2020

क्रेडाईतर्फे अकुशल व बेरोजगारांसाठी दोन महिन्यांच्या मोफत प्रशिक्षणाचे आयोजन प्रशिक्षणादरम्यान दरमहा 10 हजार रुपये मानधन इच्छुकांनी प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


            जालना, दि. 2 -  बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई या संघटनेने आत्मनिर्भर व कुशल बांधकाम कामगार वर्ग घडविण्यासाठी कुशलता अभियानास सुरुवात केलेली आहेया अभियानांतर्गत पाचवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या व 18 वर्षावरील अकुशल व बेरोजगार तरुण, स्त्री व पुरुषांना अनुभवी प्रशिक्षकांकडून ज्या ठिकाणी बांधकाम सुरु आहे तेथेच दोन महिन्यांसाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.  यामध्ये मेसनरी, बार बेंडीग आणि स्टील फिक्सिंग, शटरिंग, कार्पेन्टरी, इमारत रंगकाम, प्लम्बिंग, टाईलिंग आणि इलेक्ट्रीकल टेक्निशियन या शाखांमध्ये प्रामुख्याने प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणार्थींची मोफत निवासाची व्यवस्था करण्याबरोबरच १० हजार रुपये मानधन म्हणून दिले जाणार आहे उत्तीर्ण झालेल्या मजुरांना प्रशिक्षण समाप्त होताच पुण्यात अथवा पुण्याच्याआसपास असलेल्या प्रकल्पावर नोकरीही दिली जाणार आहे  रुजू झालेल्या ठिकाणी किमान एक वर्ष कामगाराला काम करावे लागणार आहे.  प्रशिक्षणानंतर अकुशल व बेरोजगार युवा व युवती कुशल कामगार म्हणून बांधकाम क्षेत्रात काम करु शकतात
            जालना जिल्ह्यातील इच्छुक असणाऱ्या अकुशल व बेरोजगार तरुण, स्त्री व पुरुषांनी या प्रशिक्षणासाठी 8390902500,9767645589 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेली माहिती https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeRHDiH5HxwtWD2QYRJTYIz3SEt6FpIlizh7zQtznEsIdFymQ/viewform?usp=sf_link या गुगल लिंकद्वारे भरावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.
*******

No comments:

Post a Comment