Wednesday 22 July 2020

दुचाकीसह 78 हजार 216 रुपयांचा मुद्देमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क जालना यांची कारवाई



     जालना दि. 22 (जिमाका) :-निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक जालना यांनी दि.22 जुलै 2020 रोजी जालना मंठा रोड सिंधी काळेगाव शिवार ,ता.जि.जालना येथे अवैध मद्य वाहतुक करणारी होंडा कंपनीची युनिकॉन दुचाकी जप्त करुन  78 हजार 216रुपयां चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
       विभागीय उपआयुक्त औरंगाबाद विभाग श्री.एन.व्ही.सांगळे  सो.व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ,जालना   सुधाकर कदम सो.यांच्या मार्गदर्शना खाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ,भरारी पथक कार्यालयाने जालना -मंठा रोड येथे अवैध मद्य वाहतुक  करणा-या होंडा कंपनीचे युनिकॉर्न वाहन क्रं. MH-21 BE -7944  वर देशी दारु भिंगरी संत्राच्या एका प्लॅस्टिक गोणीत 180 मि.ली. क्षच्या 96 सिंलबंद बाटल्या वाहतुक करताना राहुल रविंद्र जैस्वाल वय 37 वर्ष रा. गांधी रोड रामनगर जालना  यास अटक्‍ करण्यात आली. या कारवाईमध्ये 74 हजार 992 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच खडी मशीन अंतरवाला शिवारात डोंगराच्या पायथ्याशी रामकिसन पंडीत सिरसाठ वय 30 वर्ष रा. कुंभेफळ ता. जि. जालना यांच्या ताबा कब्जातुन देशी दारु भिंगरी संत्रा 180 मि.ली. क्ष च्या 62 सिलबंद बाटलया 3 हजार 224 रुपयांचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यास अटक करण्यात आली.
    या कारवाईमध्ये निरीक्षक सु.अ. गायकवाड दुय्यम निरीक्षक अनिल बिडकर, अभय औटे, जवान, सुनिल कांबळे, एस.टी. डहाळे, देवा आडेप, डी. एच. सांबारे सहभागी होते.
*-*-*-*-*-*-*

No comments:

Post a Comment