Thursday 9 July 2020

खासगी दवाखान्यांनी कोव्हीड बाधित रुग्णांवर उपचारासाठी 80 टक्के खाटा राखीव ठेवाव्यात


            जालना, दि. 9 -  शासन निर्देशानुसार खासगी रुग्णालयात कोव्हीडसाठी 80 टक्के खाटा राखीव ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असुन त्यानुसार जालना येथील खासगी दवाखान्यामधील 80 टक्के  खाटा कोव्हीड19 आजाराने बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी राखीव ठेवण्यात याव्यात, अशा सुचना जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी रुग्णालयांना एका पत्राद्वारे दिल्या आहेत.
            यामध्ये दीपक हॉस्पीटल-80 खाटा, ओम हॉस्पीटल 40, संजिवनी हॉस्पीटल 64, जालना हॉस्पीटल 64, विवेकानंद हॉस्पीटल 36, जालना मिशन हॉस्पीटल 77, जालना क्रिटीकल हॉस्पीटल 72, आस्था हॉस्पीटल 36, चिरंजीव बाल रुग्णालय 26, नुर हॉस्पीटल 80, निरामय हॉस्पीटल 40, गुरुमिश्री हॉस्पीटल 56, डॉ. पाटील आयुर्वेदीक हॉस्पीटल 80, संतकृपा हॉस्पीटल 40 वरकड हॉस्पीटल 36. तसेच ज्या खासगी रुग्णालयांना कोव्हीड रुग्णालयाची परवानगी देण्यात आलेली आहे, अशा दवाखान्यांनीसुद्धा त्यांच्या रुग्णालयातील 80 टक्के खाटा राखीव ठेवाव्यात. शासनाने जाहीर केलेल्या सुचनांप्रमाणे रुग्णालयातील खाटांची संख्या व त्यानुसार नोटीफिकेशनमध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तीच्या अधिन राहुन सेवा देण्याच्या सुचनाही दिल्या असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
******* 

No comments:

Post a Comment