Tuesday 21 July 2020

संजीवनी रुग्णालयात कोव्हिड हॉस्पिटलचा पालकमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ


    जालना, दि.21 (जिमाका) :- जालना शहरातील अंबड चौफुली जवळ असलेल्या संजीवनी या खाजगी रुग्णालयात कोव्हिड बाधितांवर उपचार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कोव्हिड हॉस्पिटलचा शुभारंभ राज्याचे  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेशा टोपे यांच्या हस्ते नुकतेच फित कापून करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक श्रीमती डॉ. अर्चना भोसले, डॉ. बळीराम बागल, डॉ. हुपेश जाधव, डॉ. मिरकड, डॉ. राजगुरु, डॉ.म्हस्के आदींची उपस्थिती होती.
            यावेळी पालकमंत्री श्री. टोपे म्हणाले  खाजगी दवाखान्यांनी कोरोना बाधितां बरोबरच गंभीर स्थितीमध्ये असलेल्या रुग्णांवर प्राधान्याने उपचार करावेत. जिल्ह्यातील खाजगी दवाखान्यांना त्यांच्या क्षमतेच्या  80 टक्के खाटा कोव्हिड बाधित रुग्णांवर उपचारासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून त्यानुसार राखीव ठेवण्यात आलेल्या खाटांचे सर्वसामान्यांना योग्य पध्दतीने मिळाव्यात असे सांगत खासगी दवाखान्यांना आवश्यक असणारी सर्व ती मदत जिल्हा शल्य चिकित्सकांनी करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
*-*-*-*-*-*

No comments:

Post a Comment