Wednesday 22 July 2020

शेतरस्ते करण्याची चळवळ उभी व्हावी -पालकमंत्री राजेश टोपे




             जालना, दि. 22  (जिमाका) :- राहेरा येथे राज्याचे सार्वजनिक आरोग्य, कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  राजेश टोपे यांच्या माध्यमातून होत असलेल्या शेतरस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला.
         यावेळी जिल्हा परिषदेचे सभापती कल्याणराव सपाटे, संभाजी देशमुख, नकुल भालेकर, विनायकराव धांडगे, मुक्ताराम धांडे, बापुराव धांडगे, श्रीचंद चव्हाण,रमेश धांडगे,चंद्रकांत धांडगे आदी उपस्थित होते.
 याप्रसंगी पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, ग्रामीण जीवनाचा कणा असलेल्या शेती व्यवसायामध्ये शेतरस्ते प्रकरणातून होणारे वाद, त्यातुन दाखल होणारे खटले आणि यामुळे होणारे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी गावा-गावामध्ये समजदार व्यक्तींनी पुढाकार घेऊन शिवारातील प्रत्येक शेतात जाण्यासाठी रस्ते बनऊन घेण्यासाठी चळवळ उभी करणे काळाची गरज बनली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
*-*-*-*-*-*-*

No comments:

Post a Comment