Monday 18 May 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सुचनांचे तंतोतंत पालन करा कंन्टेंटमेंट झोन म्हणून घोषित केलेल्या परिसरातील नागरिकांनी १४ दिवस होम क्वारंटाईन व्हावे परजिल्हा, परराज्यातुन आलेल्या नागरिकांची माहिती जिल्हा प्रशासनास द्या. - जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आवाहन


जालना, दि. 18 (जिमाका):- जालना जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित आढळलेल्या परिसराला कंन्टेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. परंतू या कंन्टेंटमेंट झोनमधुन मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले असुन ही बाब निश्चितच चांगली नाहीकोरोनाचा प्रादुभार्व रोखण्यासाठी प्रशासनामार्फत योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असुन कोरोनाला जालना जिल्ह्यातुन हद्दपार करण्यासाठी प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करण्याबरोबरच कंन्टेंटमेंट झोन म्हणून घोषित केलेल्या परिसरातील नागरिकांनी १४ दिवस होम क्वारंटाईन होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.
            सार्वजनिक ठिकाणी तसेच अत्यावश्यक कामांसाठी बाहेर पडताना मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. जे नागरिक सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरत असतील त्यांच्यावर नगरपालिका प्रशासनामार्फत पोलीस विभागाच्या सहकार्याने दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकाना विनामास्क फिरण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. त्याचबरोबरच प्रशासनाच्या खबरदारीमुळे घनसावंगी तालुक्यातील  पीरगबवाडी येथील कोरोनाबाधितांचा शोध घेणे शक्य झाले आहे. जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या अँटीकोरोना फोर्सने दक्षता घेऊन मुंबई, पुणे इतर जिल्ह्यातुन जालना जिल्ह्यात येत असतील तर त्यांची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावीपरजिल्हा, परराज्यातुन येणाऱ्यांचे विलगीकरण करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

******* 

No comments:

Post a Comment