Monday 18 May 2020

मान्सुनपूर्व कामे १५ दिवसांमध्ये पुर्ण करा नॉनकोव्हीड रुग्णांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या शोध,तपासणी व उपचार या त्रीसुत्रीचा प्रभावीपणे वापर करा - जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे




जालना, दि. 18 (जिमाका) :- जिल्ह्यातील मान्सूनपुर्व कामे येत्या १५ दिवसांमध्ये पुर्ण करुन घेण्याबरोबरच सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे.  तसेच पावसाळयामध्ये सर्दी, ताप, खोकला यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ होते.  यामुळे प्रत्येक रुग्णाला कोरोनाची बाधा झालेली आहे असे न समजता शोध, तपासणी व उपचार या त्रीसुत्रीचा प्रभावीपणे वापर करत नॉनकोव्हीड रुग्णांनाही योग्य त्या वैद्यकीय सुविधा पुरविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले.
                मान्सुन 2020 पुर्वतयारी आढावा बैठकीचे सोशल डिस्टन्सींगचे पालन करत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधताना जिल्हाधकारी श्री बिनवडे  बोलत होते.
                यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
                जिल्हाधिकारी श्री. बिनवडे म्हणाले की, जिल्ह्यातील मान्सुन कालावधीत पूर अथवा वादळामुळे नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी परिपुर्ण आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार ठेवावा. सर्व तहसीलदार कार्यालये, पोलीस स्टेशन यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, लघुपाटबंधारे विभाग, महावितरणच्या जिल्हास्तरीय तालुकास्तरीय कार्यालयांमध्ये नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात येऊन त्याचा अहवाल सादर करावा. सर्व नियंत्रण कक्ष नियमितपणे कार्यरत राहणे आवश्यक असून त्याबाबत वेळोवेळी तपासणी करण्यात येईल. नियंत्रण कक्ष बंद असल्याचे आढळ्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल. तालुका गावस्तरावर आपत्ती व्यवस्थापन समितीच्या स्थापना करुन त्यांच्या बैठका घेण्यात याव्यात. पूरपरिस्थिती उदभवल्यास नागरिकांना स्थलांतरीत करण्यासाठी निवाऱ्याच्या व्यवस्थेबरोबरच त्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात अन्नधान्याची व्यवस्थेचे नियोजन करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.  
                जिल्ह्यात असलेल्या विविध पाणी साठवण प्रकल्पांसह साठवण तलाव, पाझर तलाव आदींची पहाणी करण्यात यावी.  ज्या ठिकाणी दुरुस्तीची आवश्यकता असेल ती तातडीने करुन घेण्यात यावी.  आपत्तीच्या काळामध्ये विद्युत पुरवठा तसेच दुरध्वनी सेवा अखंडित सुरु राहील याची संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी.  पूरप्रवण, तलाव क्षेत्रामध्ये गावशोध बचाव पथक, पूर्वसुचनागट, पट्टीच्या पोहणाऱ्या लोकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्याबरोबरच प्रत्येक उप विभागीय अधिकाऱ्यांनी तालुकास्तरीय मान्सुनपूर्व तयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात यावे. जिल्ह्यातुन वाहणाऱ्या नदीचे, नाल्यांचे नैसर्गिक पात्र अतिक्रमणामुळे अरुंद झाले असेल तर अशा ठिकाणची अतिक्रमणे तातडीने काढावीत.  जिल्ह्याच्या शहरी  भागातील गटार व्यवस्था, नालेसफाई नैसर्गिकपणे वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यात अडथळा निर्माण करणारी झाडे, झुडपे काढून पाण्याचा निचरा योग्यरितीने होईल, याबाबतही उपाययोजना करण्याच्या  सुचनाही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
                यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी पॉवरपाँईटच्या माध्यमातुन आपत्तीच्या काळात कोणत्या विभागाने काय कार्यवाही करावयाची आहे याबाबतची सविस्तर अशी माहिती दिली.
                बैठकीस शशिकांत हदगल, उपविभागीय अधिकारी, अंबड, शिवकुमार स्‍वामी, उपविभागीय अधिकारी, भोकरदन, भाऊसाहेब जाधव, उपविभागीय अधिकारी, परतूर, प्रशांत जाधव, कार्यकारी अभियंता, जालना पाटबंधारे विभाग, जालना,  विजय माईनकर, जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, जालना, ह.प्र. गुटटे, जिल्‍हा पशुसंवर्धन अधिकारी, जि.प. जालना, एकतपुरे, जिल्‍हा जलसंधारण अधिकारी, जि.प. जालना, श्रीकांत भुजबळ, तहसीलदार, जालना, संतोष बनकर, प्र.तहसीलदार, बदनापूर, संतोष गोरड, तहसीलदार, भोकरदन, सतीश सोनी, तहसीलदार, जाफ्राबाद, श्रीमती.रुपा चित्रक, तहसीलदार, परतूर, श्रीमती.सुमन मोरे, तहसीलदार, मंठा, राजीव शिंदे, प्र.तहसीलदार, अंबड, गौरवकुमार खैरनार, प्र.तहसीलदार, घनसावंगी, डॉ.प्रशांत पडघन, तहसीलदार (महसूल) जि.अ.का. जालना, दिपक काजळकर, जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिकारी, जालना, पठाण याहया, तलाठी जिल्‍हा नियंत्रण कक्ष यांच्यासह जिल्हयातील यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
*******



No comments:

Post a Comment