Tuesday 19 May 2020

नुतनवाडी ता. जालना येथील 11 वर्षीय मुलाच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह जिल्हा शल्यचिकित्सकांची माहिती


नुतनवाडी ता. जालना येथील 11 वर्षीय मुलाच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह
जिल्हा शल्यचिकित्सकांची माहिती
                जालना, दि. 19 (जिमाका) :- मुंबईवरुन परतलेले नुतनवाडी ता. जालना येथील रहिवासी असलेले 11 वर्षीय मुलगा व त्याची 16 वर्षीय बहीण नुतनवाडी ता. जालना येथे दि. 16 मे 2020 रोजी आले होते. या दोघांपैकी 11 वर्षीय मुलाला दि. 17 मे 2020 रोजी ताप येत असल्यामुळे त्याला व खबरदारीची बाब म्हणुन त्याच्या बहिणीलाही जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या दोघांपैकी 11 वर्षीय मुलाच्या स्वॅबचा अहवाल दि. 18 मे 2020 रोजी प्रयोगशाळेकडुन पॉझिटीव्ह प्राप्त झाला तर त्या मुलाच्या 16 वर्षीय बहीणीचा अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाला असुन या मुलाच्या संपर्कात आलेल्या हायरिस्क सहवाशीतातील एकुण 10 व्यक्तींच्या स्वॅब घेण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
            जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. जालना यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी, जालना व वैद्यकीय अधिकारी पिरपिंपळगाव यांनी दोन टिमच्या साह्याने नुतनवाडी येथील एकुण 57 कुटुंबातील 278 लोकांचे आरोग्य सर्वेक्षणाचे काम सुरु केले आहे.
            जिल्ह्यात एकुण 1837 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 40 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 897 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 65 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या 1527 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने -01 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 36 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 1421, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 259, एकुण प्रलंबित नमुने -66 तर एकुण 857 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.
14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या -17, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 765 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या-46, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -557, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-13, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या -40, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या -31, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 1176 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे.  
            आजपर्यंत जालना जिल्ह्यात इतर राज्यातुन 179 व राज्याच्या इतर जिल्ह्यातुन 6622 असे एकुण6801 नागरीक दाखल झाले आहेत. या सर्वाना 14 दिवस होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातुन आजपर्यंत उत्तरप्रदेश2727, मध्यप्रदेश -777, बिहार 160, तेलंगणा- 27, राजस्थान-167, झारखंड 30, आंध्रप्रदेश -103, ओरिसा 113, छत्तीसगड- 10, हैद्राबाद-05 असे एकुण 4119 नागरीकांना परराज्यात पाठविण्यात आले आहे.
             कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 557 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास होस्टेल जालना-34, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-17,  मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-6, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-22,पोलीस प्रशिक्षण केंद्र-115 मॉडेल स्कुल, अंबा रोड, परतुर-00, हिंदुस्थान मंगल कार्यालय,जाफ्राबाद-04, जिजाऊ इंग्लिश स्कुल, जाफ्राबाद-46, राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल, टेंभुर्णी, जाफ्राबाद -103, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड -32, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-12, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे 41, अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी-35, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन इमारत क्र. 1-60,डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टे क्र.2 भोकरदन-00, मॉडेल स्कुल मंठा-30 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.
            लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 595 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 108 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 587 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 90 हजार 100 असा एकुण          316908 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  
*******   

No comments:

Post a Comment