Thursday 21 May 2020

जिल्ह्यात तीन व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह तीन कोरोना बाधितांच्या स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह तिघांनाही कोव्हीड रुग्णालयातुन डिस्चार्ज - जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती बिहारमध्ये जाणाऱ्या नागरिकांसाठी आज विशेष श्रमिक रेल्वे

जालना, दि. 21 (जिमाका) :-   मुंबई येथून परतलेले दोन पुरुष व एक महिला सिद्धेश्वर पिंपळगाव ता. अंबड येथे गेले असता सरपंच आणि इतर ग्रामस्थांच्या जागरुकतेमुळे या तिघांनाही अंबड येथे कोव्हीड सेंटमध्ये पाठविण्यात आलेतेथुनया तिघांनाही जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले असता दि. 21 मे, 2020 रोजी तिघांच्याही स्वॅबचा अहवाल प्रयोगशाळेकडून पॉझिटीव्ह प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिली आहेतसेच बिहार राज्यातील छापरा येथे जाण्यासाठी आज दि. 22 मे, 2020 रोजी विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात येणारअसल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.
            रंगनाथनगर पाण्याची टाकी परिसर, जालना येथील एक महिला, आनंदनगर, सतकर कॉम्प्लेक्स परिसर येथील एक महिला तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्यामहिला डॉक्टर या तीनही रुग्णांच्या स्वॅबचे अहवाल प्रयोगशाळेकडून निगेटीव्ह प्राप्त झाल्यामुळे या तिघांनाही आज दि. 21 मे, 2020 रोजी कोव्हीड हॉस्पीटल येथुन डिस्चार्ज देण्यात आला.
            बिहार या राज्यातील कामगारांना बिहारमधील छापरा या ठिकाणी पाठविण्यासाठी जालना येथुन विशेष मोफत रेल्वे शुक्रवार दि.22 मे, 2020 रोजी सायंकाळी सोडण्यात येणार आहेही रेल्वे दानापुर, आरा या रेल्वे स्थानकावर थांबणार असुन शेवटचे ठिकाण छापरा हे असणार आहेजालना शहरातील बिहार येथे जाणाऱ्या नागरिकांनी दुपारी १-00 वाजता आय.टी. आय. कॉलेज, चंदनझिरा, जालना याठिकाणी उपस्थित रहावे. त्यांना रेल्वे स्थानकापर्यंत बसने पोहोचविण्यात येणार असुन तालुका स्तरावरुन बिहार येथे जाणाऱ्या नागरिकांना संबंधित तहसिल कार्यालयात सकाळी 11-00 वाजता उपस्थित रहावे. तेथुन त्यांना जालना रेल्वे स्थानकावर आणण्याची व्यवस्था करण्यात आली असुन या विशेष रेल्वेसाठी नोडल अधिकारी म्हणून राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाचे संचालक मनोज देशमुख यांनी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.
            जिल्ह्यात एकुण 1887 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 45 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 918 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 137 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या 1823 एवढी आहेदैनिक पॉझिटीव्ह नमुने -03 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 44 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 1638, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 327, एकुण प्रलंबित नमुने -137 तर एकुण 873 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.
14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या-18, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 785 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या-16, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -589, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-03, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या -45, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या -01, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 1309 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे.  
            आजपर्यंत जालना जिल्ह्यात इतर राज्यातुन 218 व राज्याच्या इतर जिल्ह्यातुन 8533 असे एकुण–8751 नागरीक दाखल झाले आहेत. या सर्वाना 14 दिवस होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातुन आजपर्यंत उत्तरप्रदेश2728, मध्यप्रदेश -782, बिहार 160, तेलंगणा- 27, राजस्थान-167, झारखंड 30, आंध्रप्रदेश-103, ओरिसा113, छत्तीसगड- 10, हैद्राबाद-08 असे एकुण4128 नागरीकांना परराज्यात पाठविण्यात आले आहे.
            कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 589 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास होस्टेल जालना-34, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-26,  मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-6, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-22,पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना -115 मॉडेल स्कुल, अंबारोड, परतुर-00, हिंदुस्थान मंगल कार्यालय,जाफ्राबाद-14, जिजाऊ इंग्लिश स्कुल, जाफ्राबाद-46, राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल, टेंभुर्णी, जाफ्राबाद -102, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड -32, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-18, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे 45, अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी-37, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन इमारत क्र. 1-60,डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल क्र.2 भोकरदन-00, मॉडेल स्कुल मंठा-32 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.
            लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 618 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 117 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 597 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 90 हजार 100 असा एकुण 3 लाख 16 हजार 908 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  
-*-*-*-*-*- 

No comments:

Post a Comment