Thursday 21 May 2020

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली प्रतिज्ञा


जालना, दि.21: तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावरील दहशतवादी हल्ल्याचा विरोध म्हणून दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसपाळण्यात येतो. या दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी  निवृत्ती गायकवाड  यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा दिली.
            यावेळी  उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन श्रीमती शर्मिला भोसले, नायब तहसिलदार श्रीमती मयुरा पेरे, श्रीमती आर. आर. महाजन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त घेण्यात आलेली प्रतिज्ञा
आम्ही, भारताचे नागरिक, आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णूतेच्या
परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून याद्वारे, सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व
हिंसाचाराचा आमच्या सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची गांभीर्यपूर्वक
प्रतिज्ञा करत आहोत. आम्ही प्रतिज्ञा करतो की, आम्ही सर्व मानवजातीमध्ये
शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवू व वर्धिष्णू करु, तसेच मानवी
जिवीत आणि मूल्ये धोक्यात आणणाऱ्या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करु.
-*-*-*-*-*













No comments:

Post a Comment