Wednesday 27 May 2020

पीककर्जासाठी शेतकऱ्यांना बँकाकडून संदेश प्राप्त होताच आवश्यक त्या कागदपत्रांसह शेतकऱ्यांनी बँक शाखेत उपस्थित राहण्याचे आवाहन


जालना दि. 27 (जिमाका) –  खरीप हंगाम 2020-21 करीता जिल्ह्यामध्ये बँकातर्फे पिककर्ज वाटप सुरु आहे. जागतिक महामारी कोवीड – 19  विषाणु संसर्गाच्या पार्श्वभुमीवर शासनाकडुन देशपातळीवर संचारबंदी घोषीत करण्यात आलेली  आहे. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या  अनुषंगाने कोविड  -19 या आजाराचा प्रसार होऊ नये. यासाठी होणा-या गर्दीचे नियमन करण्यासाठी जालना जिल्ह्यातील पिक कर्जासाठी इच्छुक शेतक-यांनी  https://forms.gle/2T19Tth3uQFe5CgS9   या संकेतस्थळावरील, गुगल लिंकवरील ऑनलाईन अर्ज भरुन पीक कर्ज मागणी नोंदणी दि. 31 मे अखेरपर्यंत करण्यात येत आहे. सदरची लिंक jalna.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध असुन या लिंकद्वारे  नोंदणी केलेल्या शेतक-यांच्या याद्या जिल्हा अग्रणी बँक, जालना यांचे मार्फत संबंधीत बँकेकडे पाठविण्यात येत आहे. यादी प्राप्त झाल्यानंतर संबंधित बँक शाखेकडुन पीक कर्ज घेण्यास पात्र असणा-या शेतक-यांना दुरध्वनी, लघुसंदेश (SMS) पाठविण्यात येत आहे. बँकमार्फत दुरध्वनी, लघुसंदेश (SMS) प्राप्त झालेल्या शेतक-यांनी बँकेने दिलेल्या तारखेस खालील कागदपत्रासह शाखेत जावे.
 राष्ट्रीयकृत, व्यापरी, ग्रामीण बँकेसाठी आवश्यक कागदपत्रे 7/12 सर्वांसाठी आवश्यक, 8 अ सर्वांसाठी आवश्यक, फेरफार नवीन कर्जदारांसाठी आवश्यक तसेच मागील 5 वर्षांमध्ये मालकी हक्कात बदल (वारस किंवा खरेदी विक्रीद्वारे )असल्यास जुन्या कर्जदारांसाठीही आवश्यक आहे, आधर कार्ड सर्वांसाठी आवश्यक, फोटो 2 सर्वांसाठी आवश्यक, लीगल सर्च रिपोर्ट  (कायदेशीर शोध अहवाल)   1 लाख रुपयापर्यंतचे कर्जासाठी आवश्यक नाही, 1 लाखाच्यावरील कर्जासाठी आवश्यक, ना देय प्रमाणपत्र (No Dues Certificate) इतर बॅकांचे No Dues Certificate आवश्यक नाही. त्याऐवजी स्टॅम्प पेपवरील स्वयं घोषणापत्र  आवश्यक राहील. बॅकानी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दि. 28 जानेवारी 2015 रोजीच्या परिपत्रकाप्रमाणे कार्यवाही करावी, गहाणखताचे घोषणापत्र (Declaration Mortgage) बँकेच्या नियमानुसार आवश्यक राहील,
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकरीता आवश्यक कागदपत्रे  7/12 सर्वांसाठी आवश्यक, 8 अ सर्वांसाठी आवश्यक, फेरफार नवीन कर्जदारांसाठी आवश्यक तसेच मागील 5 वर्षांमध्ये मालकी हक्कात बदल (वारस किंवा खरेदी विक्रीद्वारे )असल्यास जुन्या कर्जदारांसाठीही आवश्यक आहे, आधर कार्ड सर्वांसाठी आवश्यक, फोटो 2 सर्वांसाठी आवश्यक, लीगल सर्च रिपोर्ट  (कायदेशीर शोध अहवाल)   1 लाख रुपयापर्यंतचे कर्जासाठी आवश्यक नाही, 1 लाखाचेवरील कर्जासाठी आवश्यक, ना देय प्रमाणपत्र (No Dues Certificate) इतर बॅकांचे No Dues Certificate आवश्यक नाही. त्याऐवजी स्टॅम्प पेपवरील स्वयं घोषणापत्र  आवश्यक राहील. बॅकानी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दि. 28 जानेवारी 2015 रोजीच्या परिपत्रकाप्रमाणे कार्यवाही करावी, संबंधित वि.का.स. संस्थेच्या ठराव आणि कमाल मर्यादा पत्रकात नावाचा समावेश असावा, स्टॅम्प पेपर बँकेच्या नियमानुसार आवश्यक राहतील.
याद्वारे कळविण्यात येते की, सर्व बँकांनी केवळ वरील प्रमाणे नमुद कागदपत्रे पीक कर्ज मंजुर करतेवेळी शेतक-यांकडुन घेण्यात यावीत. इतर अनावश्यक कागदपत्रांची मागणी बॅंकांनी करु नये. बँकेने अनावश्यक कागदपत्रांची मागणी केल्यास तसेच पीक कर्ज मंजुर करण्यास टाळाटाळ केल्यास शेतक-यांनी संबंधीत तालुक्यातील तहसिलदार, सहायक निबंधक, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, द्वारा मुख्य शाखा बँक ऑफ महाराष्ट्र जालना व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जालना येथे संपर्क साधावा, असे आदेश जिल्हाधिकारी जालना  रवींद्र बिनवडे  यांनी दिले आहेत.
-*-*-*-*-*-

     


No comments:

Post a Comment