Monday 25 May 2020

जिल्ह्यात 10 व्यक्तींच्या स्वॅबचे अहवाल पॉझिटीव्ह तीन रुग्णांच्या स्वॅबचा अहवाल उपचाराअंती निगेटीव्ह तिघांनाही रुग्णालयातुन डिस्चार्ज


जालना दि. 25 (जिमाका) –  दि. 25 मे 2020 रोजी जिल्ह्यातील 10 व्यक्तींच्या  स्वॅबचा अहवाल प्रयोगशाळेकडून पॉझिटिव्ह  प्राप्त झाला असुन तीन रुग्णांच्या स्वॅबचा अहवाल उपचाराअंती निगेटीव्ह आल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. 
मुंबईवरुन परतलेले व मुळचे नुतनवाडी ता. जालना  येथील रहिवाशी असलेले 11 वर्षीय मुलगा, 16 वर्षीय  बहीण व त्यांचे 42 वर्षीय वडील नुतनवाडी ता. जालना येथे दि. 16 मे 2020 रोजी आले होते. 11 वर्षीय मुलाच्या स्वॅबच्या अहवाल दि. 18 मे 2020 रोजी प्रयोगशाळेकडुन पॉझिटिव्ह प्राप्त झाला तर 16 वर्षीय बहीण व 42 वर्षीय वडीलांच्या अशा दोन जणांच्या स्वॅबचा अहवाल दि. 25 मे रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे.
मुंबई वरुन परतलेली व मुळची शिरनेर ता. अंबड येथील रहिवाशी असलेली 38 वर्षीय महिला दि. 16 मे 2020 रोजी गावाकडे आली असता गावातील सरपंच व पोलीस पाटील यांनी त्यांना गावात प्रवेश न करु देता कोव्हीड केअर सेंटर, अंबड येथे तपासणीसाठी पाठविले होते. दि. 18 मे 2020 रोजी  त्यांना पुढील उपचार व तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय जालना या ठिकाणी पाठविले होते. दि. 25 मे 2020 रोजी त्यांच्या स्वॅबचा अहवाल प्रयोगशाळेकडुन पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे.
मुळची हनवतखेडा ता. मंठा येथे रहिवाशी असलेली 78 वर्षीय महिला दि. 20 मे 2020 रोजी मुंबईवरुन परतल्या होत्या. शेतात पाय घसरुन पडल्यामुळे त्यांच्या पाय व कंबरेला मार लागल्यामुळे त्यांना जालना शहरातील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दि.23 मे 2020 रोजी  त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना या ठिकाणी उपचारासाठी पाठविले होते. त्यांच्या स्वॅबचा अहवाल दि. 25 मे 2020 रोजी  प्रयोगशाळेडुन पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे.
मुंबईवरुन परतलेली व कानडी ता. मंठा येथील रहिवाशी  23 वर्षीय गर्भवती असलेल्या महिलेस सर्दी व ताप याचा त्रास होत असल्यामुळे त्यांना कोव्हीड केअर सेंटर मंठा येथे दाखल करण्यात आले होते. दि. 22 मे 2020 रोजी तिच्या स्वॅबचा नमुना प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविला होता.  त्याचा अहवाल दि. 25 मे 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला असून संबंधित महिलेस पुढील उपचारासाठी दि. 25 मे 2020 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय जालना या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
 जुना जालना परिसरातील एका खाजगी रुग्णालयातील चार कर्मचारी व एका कर्मचा-याच्या निकट सहवाशीतातील एका वर्षीय मुलगा असे एकुण पाच जणांच्या स्वॅबचे नमुने प्रयोगशाळेकडुन दि. 25 मे 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे.
कानडगांव ता. अंबड येथील 29 वर्षीय तरुण मुंबई येथुन 52 वर्षीय आई गावाकडे आले होते. या दोघांच्या स्वॅबचा नमुना प्रयोगशाळेकडुन दि. 10 मे 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता  उपचाराअंती या दोघांच्या स्वॅबचा अहवाल प्रयोगशाळेकडुन  निगेटिव्ह प्राप्त झाला आहे तर परतूर शहरातील 32 वर्षीय तरुणाच्या स्वॅबचा नमुना प्रयोगशाळेकडून दि. 12 मे, 2020 रोजी पॉझिटीव्ह प्राप्त झाला होता.  उपचाराअंती या तरुणाच्या स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह आल्याने या तिघांनाही  दि. 25 मे 2020 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयांतुन डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिली.
जिल्ह्यात एकुण 2033 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 57 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 986 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 54 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या 2117 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने -10 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 71 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 1986, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 335, एकुण प्रलंबित नमुने -56 तर एकुण 929 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.
14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या- 08, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 818 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या- 30, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -354, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-18, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या -57, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या -29, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-2103 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे.  
            जालना जिल्ह्यातुन आजपर्यंत उत्तरप्रदेश – 2728, मध्यप्रदेश – 782, बिहार-1068, तेलंगणा- 27, राजस्थान- 167, झारखंड – 30, आंध्रप्रदेश – 103, ओरिसा – 113, छत्तीसगड – 10, हैद्राबाद -08 असे एकुण 5036 नागरिकांना परराज्यात पाठविण्यात आले आहे.  आजपर्यंत जालना जिल्ह्यात इतर राज्यातुन 328 व राज्याच्या इतर जिल्ह्यातुन  11110 असे एकुण 11438 नागरीक दाखल झाले आहेत. या सर्वांना 14 दिवस होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.         
            कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 354 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास होस्टेल जालना-00, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-24,  मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह -33, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-29,पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना -24 मॉडेल स्कुल, अंबारोड, परतुर-00, हिंदुस्थान मंगल कार्यालय,जाफ्राबाद-13, जिजाऊ इंग्लिश स्कुल, जाफ्राबाद-44 राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल, टेंभुर्णी, जाफ्राबाद -19, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड -07, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-23, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे 45, अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी-37, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन इमारत क्र. 1-00,डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल क्र.2 भोकरदन-00, मॉडेल स्कुल मंठा-44 शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर - 2, सेठ ई.बी.के. विद्यालय टेंभुर्णी-10व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.
            लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 659 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 118 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 609 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 94 हजार 930 असा एकुण  3 लाख 21  हजार 738 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  

            राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या सुचनेनुसार जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी कोव्हीडच्या अनुषंगाने जिल्ह्यातील आरोग्य विभागातील आर.बी. एस. के. अंतर्गत           10 पुरुष डॉक्टर, 9 वैद्यकीय महिला अधिकारी, 1 शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी, 1 औषध निर्माता,                              3 आर.बी.एस.के आरोग्य सेविका, 11 स्टाफ नर्स स्त्री रुग्णालय, 5 आरोग्य सेविका (नवीन उपकेंद्र)  यांची रिक्तपदे उपलब्ध जिल्हास्तरीय निवड व प्रतिक्षा यादीमधुन भरण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.            
-*-*-*-*-*-   

No comments:

Post a Comment