Saturday 16 May 2020

शिधापत्रिकाधारकांना मोफत डाळीचे वाटप पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आवाहन

जालना, दि. 16 (जिमाका):- राज्यात तसेच जिल्ह्यात कोरोना विषाणुमुळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आपत्कालिन परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत अंत्योदय प्राधान्य कुटूंब योजनेकरिता एप्रिल ते जुन, 2020 या महिन्यांसाठी प्रतिशिधापत्रिका एक किलो तुरडाळ किंवा चनाडाळीचे मोफत नियतन मंजूर करण्यात आले आहे. लाभार्थ्यांना प्रतिशिधापत्रिकेवर उपलब्ध नियतनानुसार एककिलो तुरडाळ किंवा एक किलो चनाडाळ उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रिना बसेय्ये यांनी दिली आहे.
            जिल्ह्यात डाळीचे नियतन उपलब्ध झाले असुन प्रधानमंत्री गरीबकल्याण अन्न योजनेच्या मोफत तांदुळाचे नियतनासोबत डाळीचे वितरण अंत्योदय अन्न योजना   प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजनेच्या लाभार्थ्यांना वितरण करण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी नियमित नियतन, प्रधानमंत्री गरीबकलयाण अन्न योजना नियतन प्रतिशिधापत्रिका एक किलोडाळ नियतन रास्तभाव दुकानातुन सामाजिक अंतरपाळून तसेच आवश्यक सुरक्षितता बाळगून घेऊन जावे, असे आवाहनही जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे

No comments:

Post a Comment