Friday 15 May 2020

कोव्हीड योद्धयांचा आत्मविश्वास वाढविणे सर्वांची सामाजिक जबाबदारी -- जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे


जालना, दि. 15 :-  महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जालना येथील कोव्हीड हॉस्पीटल, शासकीय रुग्णालय, खासगी रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार आपल्या सर्वांच्या सेवेसाठी  दिवसरात्र वैद्यकीय सेवा देत आहेत. आपल्या सर्वांच्या सेवेत अहोरात्र मेहनत घेत असलेल्या या कोव्हीड योद्धयांचा आत्मविश्वास वाढविणे ही आपल्या सर्वांची सामाजिक जबाबदारी प्रत्येकोने या योद्धयांचा आत्मविश्वास वाढवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.
            वैद्यकीय सेवा देणाऱ्या  या सर्व कोव्हीड योद्धयांना काही समाजकंटक जाणुनबुजुन मानसिक त्रास देत आहेत.  भाड्याने राहत असलेले घर खाली करायला लावणे, सोसायटीमध्ये ये-जा करतेवेळी संशयित नजरेने पहाणे अशा बाबी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या कोव्हीड योद्धयांना मानसिक त्रास होईल अशा प्रकारची कुठलीही गोष्ट होता कामा नये.  या योद्धयांना कोणीही जाणुनबुजून त्रास देत असेल तर अशांवर कायद्यानुसार कठोर कारवाईचा ईशारा जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिला आहे.
*******  


No comments:

Post a Comment