Saturday 23 May 2020

खासगी रुग्णालयातील कर्मचारी व हिवराकाबली गावातील व्यक्तीच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह


जालना दि. 23 (जिमाका) –  नवीन जालना परिसरातील एका खाजगी रुग्णालयातील 38 वर्षीय कर्मचा-याच्या स्वॅबचा तसेच हिवरा काबली ता. जाफ्राबाद येथील रहिवाशी असलेल्या 30 वर्षीय पुरुषाचा स्वॅबचा नमुना प्रयोगशाळेकडुन दि. 23 मे 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिली.  
जिल्ह्यात एकुण 1951 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 58 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 953 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 108 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या 1957 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने -02 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 54 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 1791, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 329, एकुण प्रलंबित नमुने -108 तर एकुण 895 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.
14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या- 05, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 798 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या- 24, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -444, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-18, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या -58, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या -13, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 1803 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे.  
            जालना जिल्ह्यातुन आजपर्यंत उत्तरप्रदेश – 2728, मध्यप्रदेश – 782, बिहार-1068, तेलंगणा- 27, राजस्थान- 167, झारखंड – 30, आंध्रप्रदेश – 103, ओरिसा – 113, छत्तीसगड – 10, हैद्राबाद -08 असे एकुण 5036 नागरिकांना परराज्यात पाठविण्यात आले आहे.  आजपर्यंत जालना जिल्ह्यात इतर राज्यातुन 281 व राज्याच्या इतर जिल्ह्यातुन  10047 असे एकुण 10328 नागरीक दाखल झाले आहेत. या सर्वांना 14 दिवस होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.         
            कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 444 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास होस्टेल जालना-00, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-26,  मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह -11, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-26,पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना -45 मॉडेल स्कुल, अंबारोड, परतुर-00, हिंदुस्थान मंगल कार्यालय,जाफ्राबाद-4, जिजाऊ इंग्लिश स्कुल, जाफ्राबाद-61 राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल, टेंभुर्णी, जाफ्राबाद -108, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड -23, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-18, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे 45, अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी-37, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन इमारत क्र. 1-01,डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल क्र.2 भोकरदन-00, मॉडेल स्कुल मंठा-37, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-2 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.
            लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 643 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 118 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 601 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 92 हजार 530 असा एकुण  3 लाख 18  हजार 838 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  
-*-*-*-*-*-   

No comments:

Post a Comment