Thursday 21 May 2020

कोरोनाचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुधारित कलम 144 लागु


जालना दि. 21 (जिमाका)  -  राज्य शासनाने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनांच्या अनुषंगाने संपुर्ण राज्यात दि. 31 मे, 2020 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंतच्या लॉकडाऊन कालावधीतील सुधारित मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार जालना जिल्ह्यात कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्याच्या अनुषंगाने उपायोजना करण्याच्यादृष्टीने जालना जिल्ह्यात यापुढेही फौजदार प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतुदी लागू ठेवणे आवश्यक असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून फौजदारी दंड प्रकिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये  जालना जिल्हयात   दिनांक 31 मे 2020 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यत जालना जिल्ह्यातील संपुर्ण ग्रामीण, नागरी व औद्योगिक क्षेत्रात कोणत्याही ठिकाणी एका वेळेस 5 पेक्षा अधिक व्यक्तींना जमा होण्यास मनाई जिल्हादंडाधिकारी  रवींद्र बिनवडे  यांनी निर्गमित केले आहेत.
            शासनाने त्यांचे दि. 2 मे 2020 रोजीच्या लॉकडाऊन संदर्भातील मार्गदर्शक सुचना अधिक्रमीत करुन खालील प्रमाणे सुधारीत मार्गदर्शक सुचना निर्गमित केलेल्या असुन मनाई आदेशा दरम्यान दिनांक 31 मे 2020 पर्यत प्रतिबंधीत असलेल्या बाबी खालीलप्रमाणे.
i.                    सर्व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रवासी हवाई वाहतूक - वैद्यकीय सेवा, एअर अॅम्बुलन्स, सुरक्षा विषयक बाबी आणि गृहमंत्रालयाने परवानगी दिलेल्या बाबी वगळून बंद राहील. 
ii.                 मेट्रो रेल सेवा
  ii.    सर्व प्रकारच्या शैक्षणीक संस्था, प्रशिक्षण केंद्रे, शिकवणी वर्ग/संस्था बंद राहतील. तथापी ऑनलाईन /दुरस्थ शिक्षणाला परवानगी राहील.
 iii.   सर्व प्रकारच्या आदरातिथ्य सेवा बंद राहतील. मात्र आरोग्य /पोलीस/ शासकीय अधिकारी-कर्मचारी /आरोग्य विषयक कर्मचारी, लॉकडाऊनमुळे अडकलेल्या व्यक्ती जसे की, पर्यटक आणि अलगीकरणासाठी आवश्यक असणारी आदरातिथ्य सेवा चालु राहतील.  तसेच बस डेपो, रेल्वे स्टेशन आणि विमानतळावरील उपहारगृहे चालू राहतील. याव्यतिरिक्त बाकी सर्व उपहारगृहे आणि हॉटेल्स बंद राहतील. मात्र उपहारगृहातील खाद्यपदार्थांची घरपोच सुविधा सुरु राहील.
 iv.  सर्व सिनेमा गृहे, मॉल्स, शॉपिंग कॉम्पलेक्स, व्यायाम शाळा, क्रिडा संकुल, जलतरण तलाव, मनोरंजन केंद्रे, प्रेक्षागृहे, बार, सभागृहे, मंगल कार्यालये आणि एकत्रित जमण्याची ठिकाणे आणि तत्सम इतर ठिकाणे.
   v.   सर्व सामाजिक/राजकीय/ क्रिडा विषयक/ मनोरंजन /शैक्षणिक / सांस्कृतीक /धार्मिक कार्यक्रम / इतर संमेलने
  vi.   सर्व धार्मिक स्थळे तसेच इतर सर्व प्रार्थना स्थळे भाविकांना दर्शनासाठी बंद राहतील. सर्व धार्मिक सभा/परिषदा बंद राहतील.
२) महाराष्ट्र शासनाच्या मानक कार्यप्रणालीनुसार अटी व शर्तीचे पालन करणे आवश्यक व बंधनकारक राहील.
३) कोव्हीड19 च्या व्यवस्थापनासाठी निर्धारित केलेल्या राष्ट्रीय मार्गदर्शक सुचना व तरतुदी कायम राहीतील.
४) सहज परिणाम होईल अशा व्यक्तींची सुरक्षा

i)  65 वर्षावरील जेष्ठ नागरीक, गरोदर महिला आणि 10 वर्षाच्या खालील मुले यांनी अत्यावश्यक किंवा वैद्यकीय कारण वगळता घरातच थांबणे आवश्यक आहे.
५) मार्गदर्शक सुचनांमध्ये नमूद केल्यानुसार जालना जिल्हा नॉन रेड झोन (ऑरेंज व ग्रीन झोन) मध्ये समाविष्ट केला आहे.
६) कंटेन्टमेंट झोन
    i.  केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सुचना लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन हे त्यांच्या भागातील कंटेन्टमेंट झोन निश्चित करतील.
    ii. जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांना  कंटेनमेंट झोन निश्चित करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. जालना जिल्ह्यात उपविभागीय दंडाधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात कंटेनमेंट झोन निश्चित करण्यासाठी    जिल्हाधिकारी  यांच्यावतीने प्राधिकृत करण्यात येत आहे. निवासी कॉलनी,मोहल्ला, झोपडपट्टी, इमारत, इमारतींचा समुह, गल्ली, वॉर्ड, पोलीस ठाण्याचे क्षेत्र, गाव किंवा छोटा समुह असे कंटेनमेंट झोनचे क्षेत्र असू शकेल. यापेक्षा मोठे क्षेत्र (संपुर्ण तालुका  किंवा संपुर्ण महापालिका क्षेत्र इत्यादी) कंटेनमेंट झोन म्हणुन जिल्हाधिाकरी यांचेशी सल्लामसलत करुन निर्णय घ्यावा. जिल्हाधिकारी हे मुख्य सचिवांशी सल्लामसलत करुन निर्णय घेतील.               
 iii. कन्टेनमेंट झोनमध्ये क्षेत्रात फक्त अत्यावयक बाबीसंदर्भातील कार्याला परवानगी देण्यात येत आहे.  वैद्यकीय कारण आणि अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा वगळता अन्य कोणत्याही कारणासाठी या क्षेत्रातील लोकांना बाहेर जाण्या-येण्यास पुर्णत: प्रतिबंध करण्यात येत आहे.
7.   आरोग्य सेतू अॅपचा वापर
i.       आरोग्य सेतू संसर्गाची संभाव्य धोक्याची सुरवातीच्या काळात माहिती देते त्यामुळे ते व्यक्तींसाठी व समाजासाठी सुरक्षा कवचाप्रमाणे काम करते.
ii.     कार्यालये व कामाच्या ठिकाणांची सुरक्षीतता विचारात घेता जास्तीत जास्त कर्मचारी आरोग्य सेतू अॅप अनुरुप मोबाईल फोनमध्ये Install करतील याची खात्री करावी.
iii.  जिल्हा प्रशासन नागरिकांना आरोग्य सेतू अॅपचा वापर करावा आणि त्यांचे आरोग्याची अद्ययावत माहिती सदरील अॅपवर अपलोड करावी असे आवाहन करीत आहे. जेणे करून जोखमीच्या वेळी सबंधीताना तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देता येईल.
8. विशिष्ट प्रकरणांमध्ये व्यक्ती आणि वस्तु/ मालाची वाहतुक सुनिश्चित करण्यासाठी निर्देश
 i) सर्व यंत्रणांनी डॉकटर्स, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि रुग्णवाहिकांना कोणत्याही प्रकारच्या निर्बंधाशिवाय राज्यातल्या राज्यात आणि एका राज्यातुन दुस-या राज्यात जाण्यासाठी परवानगी द्यावी.
ii)   सर्व प्रकारच्या जीवनाश्यक वस्तुंची वाहतुक व मालवाहतुक करणा-या आणि रिकाम्या ट्रक यांना                      राज्यातल्या राज्यात येण्या – जाण्यास सर्व यंत्रणांनी परवानगी द्यावी.
iii) शेजारील देशांसोबत जे करार  करण्यात आले आहेत त्या अंतर्गत होणा-या कोणत्याही वस्तु किंवा माल-वाहतुकीस आपल्या सीमेवर प्रतिबंध करण्याचा अधिकार कोणत्याही यंत्रणेला नसेल.
9.   रेड झोन व्यतिरिक्त क्षेत्र
i या क्षेत्रात वरील मुद्या क्रमांक 1 मध्ये नसलेल्या आणि विवक्षीतपणे प्रतिबंध नसलेल्या सर्व गोष्टींना  Non Red Zone मध्ये खालील अटी व शर्तीवर परवानगी राहील.
ii.     अनुज्ञेय असलेल्या कुठल्याही बाबीसाठी कोणत्याही शासकीय अधिका-यांची परवानगीची आवश्यक असणार नाही.
iii.  क्रीडा संकुले व क्रिडागृहे तसेच सार्वजनिक वापरातील खुल्या जागावर वैयक्तीक व्यायाम करण्यासाठी परवानगी राहील. तथापी प्रेक्षक आणि समुह गतीविधींना परवानगी असणार नाही. सर्व प्रकारचे शारीरीक व्यायाम आणि इतर सर्व गोष्टी योग्य सामाजिक अंतर ठेवून करणे आवश्यक आहे.
iv.     सर्व  शासकीय व खाजगी वाहतुकीसाठी खालील प्रमाणे प्रवासी अनुज्ञेय असतील.
i.       दुचाकी केवळ चालक
ii.     तीनचाकी-  चालक व इतर 2 प्रवासी
iii.  चारचाकी- चालक व इतर 2 प्रवासी
v जिल्हांतर्गत बस वाहतुक ही आसन क्षमतेच्या कमाल 50 टक्के क्षमतेनुसार चालविण्यास परवानगी राहील. तथापि, बसमध्ये योग्य शारिरीक अंतराच्यानियमांचे पालन होण्यासह बसचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहील.
viआंतरजिल्हा बस सेवेच्या अनुषंगाने वेगळे आदेश शासनामार्फत निर्गमित करण्यात येतील.
vii.     सर्व बाजार / दुकाने सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यत सुरु राहतील. तथापी गर्दी उसळल्यास व सामाजिक अंतराच्या तत्वाचे पालन होत नाही असे दिसून आल्यास स्थानिक प्राधिकरणाने संबंधीत बाजार/दुकाने तात्काळ बंद करावीत.
10.   सर्वसाधारण सुचना – कंटेनमेंट झोनमध्ये आरोगय विषयक प्रोटोकॉल पुर्वीच्या आदेशाप्रमाणेच लागु राहील.  यासोबत जोडलेले  परिशिष्ट -3 सोयीसाठी आहे आणि मुख्य आदेशासह वाचले जाणे आवश्यक आहे.
11.   दंडात्मक तरतूदी उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा समूह यांचे विरुध्द  आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भा.दं.वि. 1860 चे कलम 188 नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
परिशिष्ट -1
गृह मंत्रालय, भारत सरकार यांनी निर्गमित केलेल्या मानक कार्यप्रणाली (SOP)
1.      परदेशी नागरिकांसाठी पारगमन व्यवस्थेबाबतीत निर्गमित (SOP) दि. 2 एप्रिल 2020
2.       राज्य, केंद्रशासित प्रदेशांमधील अडकलेल्या कामगारांच्या स्थलांतर संबंधीत  निर्गमित (SOP) दि. 19 एप्रिल 2020-05-21
3.      3. साइन- इन आणि साइन- ऑफ  भारतीय समुद्री जहाजांचे संबंधीत निर्गमित (SOP) दि. 21 एप्रिल 2020
4.    अडकलेल्या भारतीय कामगार, यात्रेकरु, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर व्यक्तींच्या संबंधीत निर्गमित (SOP) दि. 1 मे 2020.
5.     देशाबाहेर अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या आणि परदेशात जाण्यासाठी विशिष्ट व्यक्तींच्या प्रवास संबंधीत निर्गमित (SOP) दि. 5 मे 2020
6.      रेल्वेने व्यक्तींच्या प्रवास संबंधीत निर्गमित (SOP) दि. 11 मे 2020
परिशिष्ट -2
कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी निर्धारित केलेल्या राष्ट्रीय  मार्गदर्शक सुचना
1.        सर्व सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क वापरणे बंधनकारक आहे.
2.       सार्वजनिक ठिकाणी व कामाच्या ठिकाणी थुंकणे दंडनिय राहील.  व त्यासाठी संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कायद्यानुसार दंड आकारण्यात यावा.
3.       सार्वजनिक स्थानांवर आणि वाहतुकीत सर्व व्यक्तींनी सामाजिक अंतर ठेवले पाहिजे.
4.      विवाहा सारख्या सार्वजनिक कार्यक्रमात सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे. मात्र 50 पेक्षा जास्त  व्यक्तींना एकत्र येण्यास परवानगी असणार नाही.
5.       अंत्यविधी सारख्या प्रसंगी सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे. मात्र 50 पेक्षा जास्त  व्यक्तींना एकत्र येण्यास परवानगी असणार नाही.
6.       सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू, गुटखा, मद्य यांचे सेवन करण्यास मनाई राहील.
7.       सर्व दुकांनावर ग्राहकांमध्ये कमीत कमी 6 फुटाचे अंतर राखणे बंधनकारक राहील. आणि दुकानावर एकावेळी 5 पेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी असणार नाही.
कामाच्या ठिकाणी पाळावयाचे अतिरिक्त निर्देश
1.  जेथे शक्य असेल तेथे जास्तीत जास्त घरी राहून काम (Work from Home ) चा अवलंब करावा.
2. कार्यालयीन कामाची ठिकाणे, दुकाने,बाजारपेठ आणि औद्योगिक व व्यासायिक आस्थापनांमध्ये शिफ्ट निहाय कामकाजाच्या वेळा निश्चित कराव्यात.
 3.   सर्व प्रवेश व निर्गम स्थानावर थर्मल स्कॅनिंग, सॅनिटाइझर व हात धुण्याची सुविधा उपलब्ध करावी. कामाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात सॅनिटायझर, हॅड वॉश उपलब्ध करुन देण्यात यावे.
4.    सर्व कामाच्या ठिकाणाचे, सार्वजनिक सुविधांचे आणि मानवी संपर्कात येणारी सर्व ठिकाणी जसे की, दरवाजाचे हॅडल आदींचे दोन पाळयादरम्यान तसेच वांरवार निर्जतूकीकरण करावे.
5.   दोन पाळयामध्ये सुयोग्य अंतर ठेवून तसेच भोजन अवकाश योग्य वेळेचा ठेवून व इतर मार्गाचा वापर करून कामाच्या ठिकाणी योग्य सामाजिक अंतर पाळले जाईल यांची दक्षता घ्यावी.
-*-*-*-*-*-
परिशिष्ट -3
कोविड-19 लॉकडाऊन 4.0
काय सुरु राहणार व काय प्रतिबंधीत राहील
 बाब
रेड झोन
उर्वरित क्षेत्र
कंटेनमेंट झोन 
प्रवास विमान, रेल्वे, मेट्रो
नाही
नाही
नाही
आंतरराज्य वाहतुक
नाही
नाही
नाही
शाळा, महाविद्यालय
नाही
नाही
नाही
आदरातिथ्य  हॉटेल्स
नाही
नाही
नाही
 शॉपिंग मॉल्स
नाही
नाही
नाही
धार्मिक स्थळे, मोठे समारंभ
नाही
नाही
नाही
दारुची दुकाने
होय/ घरपोच सेवा
होय
नाही
बाहेर पडण्यास मनाई – 65वर्ष वयापेक्षा जास्त व्यक्ती, 10 वर्ष वयापेक्षा कमी मुले व गरोदर महिला
नाही
नाही
नाही
वैद्यकीय दवाखाने, बाह्य रुग्ण सेवा
होय
होय
नाही
टॅक्सी, कॅब, रिक्षा
नाही
1 + 2
नाही
चार चाकी
अत्यावश्यक
1 + 2
नाही
दोन चाकी
अत्यावश्यक
1
नाही
आंतर जिल्हा बस सेवा
नाही
नाही
नाही
जिल्हा अंतर्गत बस सेवा
नाही
होय
नाही
माल पुरवठा
होय
होय
होय
उद्योग (शहरी)
अत्यावश्यक
होय
नाही
उद्योग (ग्रामीण)
--
होय
नाही
शहरी  क्षेत्रातील यथावत बांधकामे
होय
होय
नाही
इतर खाजगी बांधकामे
नाही
होय
नाही
शहरी भागातील एकल दुकाने
मर्यादित
होय
नाही
जीवनावश्यक वस्तुंची दुकाने
होय
होय
होय
ई- कॉम जीवनाश्यक वस्तु
होय
होय
नाही
ई- कॉम बिगर जीवनाश्यक वस्तु
होय
होय
नाही
खाजगी कार्यालये
नाही
होय
नाही
शासकीय कार्यालये
5 टक्के (किमान 10 कर्मचारी)
होय 100 टक्के
नाही
 कृषी विषयक कामे 
नाही
होय
नाही
बँक व वित्तीय
होय
होय
नाही
कुरीयर व पोस्टल
होय
होय
नाही
वैद्यकीय अत्यावश्यक वाहतुक
होय
होय
होय
 न्हावींची दुकाने, स्पा, सलुन
नाही
होय
नाही
प्रेक्षकाशिवाय स्टेडियम
नाही
होय
नाही
उपहारगृह घरपोच सेवा
होय
होय
नाही
दुय्यम निबंधक, प्रादेशिक परिवहन/ उप प्रादेशिक परिवहन कार्यालये
होय
होय
नाही

*******








No comments:

Post a Comment