Monday 18 May 2020

जिल्ह्यात दहा व्यक्तींच्या स्वॅबचे अहवाल पॉझिटीव्ह जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती


जालना, दि. 18 (जिमाका) :-  मुंबई येथुन परतलेले व कोव्हीड केअर सेंटर, घनसावंगी येथे संस्थात्मक अलगीकरणामध्ये असलेले मुळचे पिरगेबवाडी ता. घनसावंगी येथील सहा नागरिकांचे, रांजणी ता.घनसावंगी येथील एक व्यक्ती, जालना शहरातील खासगी दवाखान्यातील दोन कर्मचाऱ्यांचा तसेच कानडगाव ता. अंबड येथील 58 वर्षीय व्यक्तीचा अशा एकुण 10 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल दि. 17 मे, 2020 रोजी पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिली आहे.
            जिल्ह्यात एकुण 1815 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 33 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 883 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 33 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या 1462 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने -10 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 35 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 1389, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 259, एकुण प्रलंबित नमुने -34 तर एकुण 850 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.
14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या -28, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 748 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या-88, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -544, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-10, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या -33, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या -9, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 1165 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे.  
लॉकडाऊनमुळे जालना जिल्ह्यात अडकलेल्या बिहार राज्यातील कामागारांना बिहारमधील छापरा या ठिकाणी पाठविण्यासाठी दि. 22 मे, 2020 रोजी विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात येणार असुन ही रेल्वे दानापूर, आरा या स्थानकावर थांबणार असुन शेवटचा थांबा हा छापरा असणार आहे.
आजपर्यंत जालना जिल्ह्यात इतर राज्यातुन 164 व राज्याच्या इतर जिल्ह्यातुन 5 हजार 926 असे एकुण                6 हजार 90 नागरिक दाखल झाले असुन या सर्वांना 14 दिवस होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.
जालना जिल्ह्यातुन आजपर्यंत बिहार-2727, आंध्रप्रदेश-103, ओरिसा-113,मध्यप्रदेश-777,छत्तीसगड-10, उत्तरप्रदेश-160, झारखंड-30,राजस्थान-167, तेलंगणा-27, हैद्राबाद-05 अशा एकुण 4 हजार 119 नागरिकांना परराज्यात पाठविण्यात आले आहे.
             कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 544 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास होस्टेल जालना-34, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-29,  मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-6, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-17,पोलीस प्रशिक्षण केंद्र-106, मॉडेल स्कुल, अंबा रोड, परतुर-00, हिंदुस्थान मंगल कार्यालय,जाफ्राबाद-05, जिजाऊ इंग्लिश स्कुल, जाफ्राबाद-34, राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल, टेंभुर्णी, जाफ्राबाद -101, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड -24, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-14, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे – 41, अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी-45, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन इमारत क्र. 1-60,डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टे क्र.2 भोकरदन-00, मॉडेल स्कुल मंठा-28 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.
            लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 595 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 106 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 587 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 90 हजार 100 असा एकुण          316908 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  
*******   


No comments:

Post a Comment