Friday 16 February 2024

शासकीय महिला राज्यगृहासाठी भाडे तत्वासाठी इमारत मालकांना आवाहन

 

 

जालना, दि. 16 (जिमाका) :-  महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत शांतीकुंज शासकीय महिला राज्यगृह जालना ही संस्था जालना येथे कार्यरत आहे. सदर संस्था अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 अंतर्गत पिडीत महिला व कोर्टा मार्फत दाखल झालेल्या तसेच संकटात सापडलेल्या महिलासाठी कार्यरत आहे. सदर संस्थेची प्रवेशितांची मान्य संख्या 100 आहे. या संस्थे करिता 5500 चौरस फुट निवासी इमारत, इमारत बांधकाम क्षेत्र त्यात 10 स्नानगृहे, 14 स्वच्छतागृहे, पिण्याच्या व वापरण्याच्या पाण्याच्या व्यवस्था, संरक्षण भिंतीसह सुस्थितीत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी व प्रवेशितांच्या दृष्टिने सुरक्षित आवारात उपलब्ध असलेली सुसज्ज इमारत शासकीय संस्थेस बांधकाम विभागाच्या चटई क्षेत्राच्या दरानुसार भाडे तत्वावर घ्यावयाची आहे. असे सर्व सोयी- सुविधायुक्त इमारत उलब्ध असल्यास इमारत मालकांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, कार्यालय प्रशासकीय इमारत तळ मजला, जालना या कार्यालयात लेखी प्रस्ताव 03 प्रतित, 07 दिवसांत सादर करण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले होते. तथापी पुरेसे प्रस्ताव या कार्यालयास प्राप्त झाले नाहीत. तरी इमारत मालकांनी त्यांचे प्रस्ताव दि.23 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करावेत. त्यानंतर आलेले प्रस्ताव स्वीकारण्यात येणार नाहीत. असे अधिक्षक, शासकीय महिला राज्यगृह, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment