Wednesday 21 February 2024

युवा संसद वक्तृत्व स्पर्धेत प्रथम धनश्री टेकाळे तर स्वप्नील खरात याने द्वितीय क्रमांक पटकावला

 

 

            जालना, दि. 21 (जिमाका) :- जिल्हास्तरीय राष्ट्रीय युवा संसद वक्तृत्व स्पर्धा दि. 17 फेब्रुवारी 2024 रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. यात जिल्ह्यातील धनश्री टेकाळे प्रथम तर स्वप्नील खरात याने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. ते दोघेही राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

नेहरु युवा केंद्रातर्फे युवकांमध्ये नेतृत्व गुण विकसित व्हावे यासाठी राष्ट्रीय युवा संसद घेण्यात आली. या स्पर्धेतून जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून युवक-युवतींची निवड करण्यात येणार आहे. नेहरू युवा केंद्रातर्फे जिल्हास्तरीय राष्ट्रीय युवा संसद वक्तृत्व स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन नेहरु युवा केंद्र संघटन महाराष्ट्र-गोवाचे राज्य संचालक प्रकाश मनुरे यांनी केले. दि. 26 फेब्रुवारी 2024 रोजी राज्यस्तरीय स्पर्धा होणार असून राज्यस्तरीय स्पर्धेमधील विजेत्यांना संसद भवनाच्या मुख्य सभागृहात होणाऱ्या राष्ट्रीय युवा संसद कार्यक्रमात विचार मांडण्याची संधी युवक-युवतींना मिळणार आहे. असे जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment