Friday 16 February 2024

महासंस्कृती महोत्सवात 17 फेब्रुवारीला होणार राष्ट्रभक्तीपर गीते, भिमगिते, शिवगीते व नृत्याचा जोशपूर्ण कार्यक्रम अलका कुबल, साधना सरगम, प्रा.राजेश सरकटे, वैशाली माडे हे राहणार उपस्थित भारुडकार, शाहीर सादर करणार लोकरंग कार्यक्रम सर्वांना विनामुल्य प्रवेश

जालना, दि. 16 (जिमाका) :- महासंस्कृती महोत्सवाअंतर्गत जेईएस महाविद्यालयाच्या प्रांगणात दि.17 फेब्रुवारी 2024 रोजी वंदे मातरम या राष्ट्रभक्तीपर गीते, भिमगीते, शिवगीतांचा व नृत्यांचा जोशपूर्ण कार्यक्रमाने महासंस्कृती महोत्सवाचा समारोप होणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण प्रसिद्ध सिनेअभिनेत्री अलका कुबल तसेच सुप्रसिध्द पार्श्वगायिका साधना सरगम, सुप्रसिध्द गायक वैशाली माडे, प्रा. राजेश सरकटे व संच, गायक रवींद्र खोमणे, मुनव्वर अली आणि सुप्रसिध्द कोरिओग्राफर संतोष भांगरे हे राहणार आहेत. शनिवार दि. 17 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता सुरु होणाऱ्या महोत्सवाच्या प्रारंभी जालना लोकरंग कार्यक्रम सादर होणार आहे. यामध्ये प्रसिध्द भारुडकार मीरा उमप व संच, संतोष वाघ आणि संच, गजानन लेखणार आणि संच, शाहिर विजय मघाडे, शाहीर अप्पासाहेब उगले, शाहिर नानाभाऊ परिहार व संच, शाहीर मिर कावळे, शाहीर विजय काटे, शाहीर बाबु सेवा राठोड व संच यांचा भारुड व शाहीरीचा कार्यक्रम होईल. त्यानंतर सायंकाळी 6:30 वा. समारोप कार्यक्रमातंर्गत वंदे मातरम हा राष्ट्रभक्तीपर गीते, भिमगीतांचा, शिवगीतांचा व नृत्यांचा जोशपूर्ण कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामुल्य आहे. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. -*-*-*-*-

No comments:

Post a Comment