Wednesday 21 February 2024

“माझी वर्दी माझा मताधिकार” या उपक्रमांतर्गत विशेष मतदार यादी नाव नोंदणी शिबीराचे आयोजन

 

 

 

  जालना दि. 21 (जिमाका) :- जिल्ह्यातील भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये कार्यरत असलेले व सेवानिवृत्त झालेले अधिकारी व जवान तसेच त्यांच्या परिवारातील सदस्य या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांचेसाठी आगामी लोकसभा सार्वत्रीक  निवडणुक 2024 च्या अनुषंगाने मतदार यादीमध्ये मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नाव नोंदणी व दुरुस्ती आदी करीता माझी वर्दी माझा मताधिकार या कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जालना येथे  दिनांक 23 फेब्रूवारी 2024 रोजी निवडणूक मतदार यादीत नाव नोंदणी व दुरुस्ती पथकाव्दारे एक दिवसीय   शिबीर राबवीण्यात येणार आहे.

 

तरी भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये कार्यरत असलेले व सेवानिवृत्त झालेले अधिकारी व जवान तसेच त्यांच्या परिवारातील सदस्य ज्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदविलेले नाही किवा दूरुस्ती करावयाची आहे असे सर्वांनी दिनांक २३ फेब्रूवारी २०२४ रोजी महासैनिक लॉन, बीड बायपास रोड, क्रीडा संकूल समोर, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जालना, येथे निवडणूक मतदार यादीत नाव नोंदणी व दुरुस्ती पथकाव्दारा आपले नाव मतदार यादीत नोंदविने किवा दूरुस्ती करण्याचा लाभ घेणेस्तव शिबीरामध्ये कार्यालयीन वेळेत उपस्थीत राहावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment