Tuesday 13 February 2024

दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू


 

जालना, दि. 13 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालांत दहावी परीक्षा व उच्च माध्यमिक शालांत बारावीची परीक्षा दि. 21 फेब्रुवारी ते 26 मार्च 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या आहेत. परीक्षा सुरळीत पार पाडण्याचे दृष्टीने परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार प्रतिबंध करण्यात आला असल्याचे आदेश प्र. अपर जिल्हादंडाधिकारी अविनाश कांबळे यांनी जारी केले आहेत.

दहावी व बारावी परीक्षाच्या कालावधीत परीक्षा केंद्रावर कोणताही गैरप्रकार होऊ नये या करिता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, छत्रपती संभाजीनगर विभाग संभाजीनगर यांनी जालना जिल्ह्यातील निश्चित केलेल्या सोबत दिलेल्या यादीनुसार परीक्षा केंद्र परिसरात परीक्षा चालु असतांना काही पालक, परीक्षा न देणारे विद्यार्थी उपद्रव करीत असतात. परीक्षार्थ्यांना नकला पुरविणे व परीक्षा केंद्राच्या परिसरात घुटमळत राहणे त्यांच्या या कृतीमुळे परीक्षा केंद्राच्या परिसरात अशांतता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, वरील परीक्षा कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 अंतर्गत वरील केंद्राच्या 100 मीटर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखणे कामी प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणुन फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 लागू करणे आवश्यक आहे.

प्र.अपर जिल्हादंडाधिकारी यांनी फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त झालेल्या शक्तीचा वापर करुन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी जालना जिल्हयातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात याद्वारे प्रतिबंधात्मक आदेश लागु करीत आहे. सदर आदेशाच्या अंमलबजावणीसाठी नोटीस देण्यास पुरेसा कालावधी नसल्याने व परीक्षा सुरळीत पार पाडण्याचे दृष्टीने फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार सदर आदेश एकतर्फी काढण्यात आला आहे. सदर आदेशाची प्रसिध्दी पोलीस अधिक्षक, जालना यांनी ध्वनिक्षेपकाद्वारे करावी. हा आदेश वरील परीक्षा कालावधीत सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अंमलात राहील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment