Friday 23 February 2024

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 3 मार्च रोजी 5 वर्षाखालील प्रत्येक बालकाला पोलिओची लस अवश्य द्या -जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

 

  



जालना, दि. 23 (जिमाका) :- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम रविवार 3 मार्च 2024 रोजी जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. 5 वर्षाखालील आपल्या बालकाला पोलिओचा डोस मिळेल याची पालकांनी खात्री करावी. नजिकच्या पोलिओ बुथवर जाऊन पोलिओ डोस घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे. तसेच आरोग्य विभागाने पल्स पोलिओची मोहिम प्रभावीपणे राबवावी असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ. आर.एस. पाटील, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. गजानन म्हस्के, समाज कल्याण अधिकारी एस.के. भोजने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी  कोमल कोरे,अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नारायण पवार, आय.एम. अध्यक्ष एम. डी. अंबेकर, आय. ए. पी अध्यक्ष डॉ. जेथलिया आदिंसह वैद्यकीय अधिक्षक तालुका  आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते. 

जागतिक आरोग्य संघटनेने सन 1988 मध्ये पोलिओ निर्मुलनाचे ध्येय निश्चित केले व त्या वर्षी जागतीक पातळीवर 3,50,000  एकुण रुग्ण व सन 2003 ला 1900 रुग्ण त्यानंतर पोलिओ रुग्णाची संख्या 125 व त्यानंतर 7 रुग्ण हे मोहिम राबविण्यात आल्यामुळे कमी झाली आहे.

      त्यानुसार राज्यात सन 1995 पासुन राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात येत आहे. या मध्ये 0 ते 5 वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओ डोस देण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे. गेल्या 26 वर्षापासुन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात सार्वजनिक आरोग्य विभाग व महिला बालकल्याण विभागामार्फत यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे. भारतामध्ये 13 फेब्रुवारी 2011 नंतर आजतागायत एकही पोलिओ रुग्ण आढळुन आलेला नाही व भारताला पोलिओ निर्मुलनाचे प्रमाण पत्र 27 मार्च 2014 मध्ये मिळालेले आहे. तरी शेजारील देशाचा पोलिओचा धोका लक्षात घेता हि मोहिम राबविण्यात येत आहे.

     जालना जिल्हयात एकुण बुथ संख्या 1793 असुन ते 5 वर्षापर्यतचे अंदाजीत लाभार्थी संख्या 2,53,653 आहे. एकुण शितसाखळी केंद्र 56 असुन सर्व ठिकाणी पर्याप्त लसीचा साठा उपलब्ध आहे.

जालना जिल्हयासाठी 3,43,000 एवढी लसीची मात्रा उपलब्ध झालेली आहे. ती सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय इ. पुरविण्यात येणार आहे. शहरी भागात 272 बुथ असुन एकुण लाभार्थी 49597 एवढे आहे. तसेच ग्रामीण भागात 1521 बुथ असुन लाभार्थी 2,04,056 एवढे आहे.

       मोहिमे अंतर्गत काही कारणास्तव लस घेता आली नाही तर आपल्या कार्यक्षेत्रात सर्वेक्षण करुन बाळास पोलिओ लस देण्यात येणार आहे.  

      जिल्हयामध्ये एकुण ट्राझीट टिम 131 असुन जिल्हामध्ये बस स्थानक, रेल्वे स्टेशन, टोल नाका, येथे प्रवाशी लाभार्थी करिता बुथ ठेवण्यात आलेले आले.

    जिल्हयामध्ये एकुण मोबाईल टिम 109 असुन विटभटया, खंडीकेंद्र, ऊसतोड कामगार, वाडया, यांच्या करिता फिरते पथक ठेवण्यात आलेले आहे.

             

                                                          -*-*-*-*-

No comments:

Post a Comment