Friday 9 February 2024

पोलीस प्रशिक्षण केंद्र व राज्य राखीव पोलीस बलात ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक संपन्न

 

 

जालना, दि. 9 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ईव्हीएम व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक व प्रचार कार्यक्रम दिनांक 10 डिसेंबर 2023 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांच्या मार्गदर्शनाखाली जालना येथे दि.7 फेब्रुवारी 2024 रोजी पोलीस प्रशिक्षण संस्थेत तसेच दि. 8 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य राखीव पोलीस बल गट- 3 मध्ये ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

प्रात्यक्षिकात ईव्हीएम मशीनच्या सहाय्याने कशाप्रकारे मतदान करतात, तसेच ईव्हीएम मशीन मधील बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि वोटर व्हेरीफीएबल पेपर ऑडिट ट्रेल कसे काम करत असते, याबद्दल मास्टर ट्रेनर वांगे यांनी सविस्तर माहिती दिली. व पोलीस प्रशिक्षणार्थी तसेच कर्मचारी, अंमलदार यांनी विचारलेल्या प्रश्नांचे, शंकांचे निरसन केले. या प्रात्यक्षिक कार्यक्रमाच्या वेळी पोलिस उपअधीक्षक श्री.भोटकर, श्री.बोंद्रे, श्री. बनकर,  राखीव पोलीस निरीक्षक श्री.गिरडकर, पोलीस उपनिरीक्षक, अंमलदार, कर्मचारी आणि पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेणारे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमोल गायकवाड, संतोष मगरे, कैलास तिडके यांनी परिश्रम घेतले. असे जिल्हा निवडणूक अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment