Friday 9 February 2024

सर्व ग्रामपंचायत बिगर सिंचन योजना धारकांना थकीत पाणीपट्टी भरण्याचे आवाहन

 

 

जालना, दि. 9 (जिमाका) :- सर्व ग्रामपंचायत बिगर सिंचन योजनाधारकांकडे  जालना पाटबंधारे विभाग जालना पाटबंधारे विभाग जालना अंतर्गत पाटबंधारे प्रकल्पातुन बिगर सिंचन ग्रामपंचायत कार्यालयांना पिण्याच्या पाण्याच्या प्रयोजनार्थ पाणी पुरवठा करण्यात येतो वापरलेल्या पाण्याच्या प्रयोजनार्थ विभागाची 370.33 लक्ष बिगर सिंचन पाणीपट्टी थकीत आहे. सर्व ग्रामपंचायत बिगर सिंचन योजनाधारकांनी थकीत पाणीपट्टी भरणा करावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता एस.बी.कोरके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

थकीत पाणीपट्टी भरणा करण्यासाठी योजना धारकांनी आपल्या योजनेची थकीत बिगर सिंचन पाणीपट्टी 7 दिवसाच्या आत जालना पाटबंधारे विभाग जालना यांच्या नावे धनादेशाद्वारे भरणा करावी अन्यथा महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 भाग 6, कलम 49 (ज) अन्वये संबंधित योजनेचा पाणी पुरवठ्यासह विद्युत पुरवठा दि. 15 फेब्रुवारी 2024 पासून खंडीत करण्याची कार्यावाही करण्यात येईल.  कार्यवाही अंती उदभवणाऱ्या जनक्षोभास हे कार्यालय जबाबदार असणार नाही याची गांर्भियाने नोंद घ्यावी. असेही कार्यकारी अभियंता, जालना पाटबंधारे विभाग, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment