Tuesday 13 February 2024

महासंस्कृती महोत्सव जालना 14 फेब्रुवारीला रंगणार महाराष्ट्राचा लोकमेळा; रसिकांना एकांकिकासह काव्य मैफिलीचा लाभ घेण्याचे आवाहन

 

 

जालना, दि. 13 (जिमाका) :- महासंस्कृती महोत्सवाअंतर्गत जेईएस महाविद्यालयाच्या प्रांगणात दि.14 फेब्रुवारी 2024 रोजी जालन्याचे भूमीपूत्र  डॉ. गणेश चंदनशिवे आणि सहकारी हे महाराष्ट्राचा लोकमेळा’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत.  तर सुरुवातीला  स्थानिक कवींची काव्य मैफल रंगणार आहे. तसेच जालना नाट्यरंग मेजवाणी - एकांकिका सादर होणार आहे.

बुधवार दि. 14 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता जालना काव्यरंग कार्यक्रमाअंतर्गत डॉ. संजिवनी तडेगावकर, विनोद जैतमहाल, डॉ. एकनाथ शिंदे, कैलास भाले, सुहास पोतदार, मनिष पाटील, नारायण खरात, डॉ.शशिकांत पाटील, गणेश खरात, मंगल धुपे, साहिल पाटील, विनोद काळे, अच्युत मोरे, रेखा गतखने, डॉ.राज रणधीर, दिगंबर दाते, वासुदेव उगले, अशोक खेडकर, राम गायकवाड, श्रीधर कोरडे, कृष्णा आर्दड, दिनेश शेळके, विद्या जाधव, ज्योती आडेकर, दिलीपकुमार सोनवणे आदि स्थानिक कवींची काव्य रसिकांसाठी  मेजवानी राहणार असून कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. सुहास सदावर्ते हे करणार आहेत.   त्यानंतर   जालना नाट्यरंग  अंतर्गत "मेजवानी  एकांकिका"सादरीकरण होणार असून यात सादरकर्ते  सतीश लिंगडे, सुमीत शर्मा व संच हे राहतील. सायंकाळी  06:30  वा. णेश रंगमंच- मुंबई प्रस्तुत  महाराष्ट्राचा लोकमेळा’ कार्यक्रमातंर्गत जालन्याचे भूमीपूत्र डॉ. गणेश चंदनशिवे आणि सहकारी हे कार्यक्रम सादर करणार आहेत. तरी रसिकांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment