Wednesday 7 February 2024

खरेदी केंद्रावर कापूस विक्री करण्याचे आवाहन

 

जालना, दि.7 (जिमाका) :- भारतीय कापूस पणन महामंडळाने (सीसीआय) चालु वर्षात जालना जिल्ह्यात हमी भावाने कापूस खरेदी जालना, बदनापूर, भोकरदन, राजूर, घनसावंगी, शहागड, मंठा आणि परतूर या केंद्रावर खरेदी सुरु आहे. तरी सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कापूस आवश्यक त्या कागदपत्रासह आपल्या जवळील भारतीय कापूस पणन महामंडळाच्या केंद्रावर विक्री करावा, असे आवाहन विभागीय व्यवस्थापक अजय गिरमे यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य  सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या छत्रपती संभाजीनगर विभागातंर्गत जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी जालना जिल्ह्यात एकुण 8 कापूस खरेदी केंद्रावर भारतीय कापूस महामंडळाकडून (सीसीआय) एफ.ए.क्यु. प्रतीच्या कापसाची किमान हमी दराने कापूस खरेदी सुरु केली आहे. असे विभागीय व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ, छत्रपती संभाजीनगर यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment