Friday 9 February 2024

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनेच्या लाभार्थ्यांची निवड 13 फेब्रुवारीला लॉटरी पध्दतीने होणार

 

 

जालना, दि. 9 (जिमाका) :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय जालना मार्फत प्रकल्प मर्यादा 1 लाख रुपये थेट कर्ज योजनेच्या जालना जिल्ह्यातील पात्र अर्जदारांनी उपस्थित रहावे, या पात्र अर्जदाराची यादी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातील सुचना फलकावर लावण्यात आली आहे. त्याकरिता दि. 13 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी ठिक 12 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात लाभार्थी निवड समिती अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी जालना यांच्या अध्येक्षतेखाली लाभार्थी निवड चिठ्याव्दारे (लॉटरी पध्दतीने) होणार आहे. अशी माहिती जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या. ) जिल्हा कार्यालय जालना मार्फत प्रकल्प मर्यादा 1 लाख रुपये थेट कर्ज योजनेअंतर्गत दि. 11 सप्टेंबर  ते 10 ऑक्टोबर 2023 या कालावधीत कर्ज मागणी अर्ज स्विकारण्यात आलेले होते. या योजनेअंतर्गत एकुण 352 कर्ज मागणी अर्ज प्राप्त झाले असुन त्यापैकी 304 कर्ज मागणी अर्ज पात्र व 48 कर्ज मागणी अर्ज अपात्र झाले आहे. पात्र कर्ज मागणी अर्जापैकी पुरुष 197 व महिला 107 आहे सदर योजनेचे 60 कर्ज प्रकरणाचे उद्दीष्ट असून त्यापैकी पुरुष 50 टक्के व महिला 50 टक्के कर्ज मागणी अर्जाची अध्यक्ष लाभार्थी निवड समिती तथा अपर जिल्हाधिकारी जालना यांनी दिलेल्या मान्येतेनुसार चिठ्याव्दारे (लॉटरी पध्दतीने) निवड करण्यात येणार आहे. असेही साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाकडून  प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

 

No comments:

Post a Comment