Tuesday 27 February 2024

"परीक्षा केंद्रावर एकाच वेळी महसुल विभागाची अचानक तपासणी"

 






     जालना, दि. 28 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (12 वी) दि. 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 दरम्यान जालना जिल्ह्यातील एकूण 80 परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आलेली आहे.

परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार टाळण्याकरीता व परीक्षेचे सुरळीत संचलनाकरीता तसेच परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पहाणी करण्याकरीता जिल्हा प्रशासनामार्फत बैठे पथक व भरारी पथकाच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे. तथापी सदर पथकामार्फत योग्य ती कार्यवाही होत नसल्याबाबातच्या तक्रारी विविध प्रसार माध्यमाव्दारे जिल्हाधिकारी यांच्याकडे  प्राप्त होत होत्या, या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पाचाळ, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार व निवासी उपजिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्यासह दि. 26 फेब्रुवारी 2024 रोजी तातडीची बैठक घेऊन एक नविन भरारी पथक कार्यान्वीत करून जिल्ह्यामध्ये कॉपीमुक्त अभियानाची काटेकोरपणे अंमलबजावणी करून कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी व परीक्षा निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले, या करीता जालना जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, अशा 26 अधिकाऱ्यांचा समावेश असलेले नियंत्रण पथकाचे आदेश निर्गमित करण्यात आले. तसेच या कार्यालयामार्फत भरारी पथकाचे आदेश निर्गमित करण्यात आले, ज्यामध्ये एकुण 14 अधिकारी यांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांनी नुतन  विद्यालय, संत ज्ञानेश्वर जुनि.कॉलेज इंदेवाडी, किंग शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक कॉलेज रेवलगाव उर्दु जुनियर कॉलेज या परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या व निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ व सर्व तहसिलदार यांनी आज परीक्षा केंद्रावर एकाच वेळी अचानक तपासणी केली व परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर बाहय उपद्रव होणार नाही या दुष्टीकोनातून पुरेसा बंदोबस्त ठेवण्याबाबत व परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यात यावी असे निर्देश दिले. तसेच परीक्षा केंद्र प्रमुख पर्यवेक्षक, बैठे पथक भरारी पथक यांनी कार्यवाही न केल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्याबाबतच्या सुचना देखील जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी जिजाऊ वरीष्ठ महाविद्यालय शेलगाव ता. बदनापुर येथील परीक्षा केंद्रावर अचानक भेट दिली. तसेच मौजे केळीगव्हाण येथे रामकृष्ण पाती आर.पी. शाळा येथे भेटी दरम्यान खालील बाबी आढळून आल्या. 

परीक्षार्थीना सुचना देण्यासाठी कुठलीही व्यवस्था/यंत्रणा आढळुन आली नाही.  विद्यार्थ्यांसोबत पालकांना सुद्धा शाळेच्या परीसरात प्रवेश दिलेला दिसुन आला. तपासणी करतांना विद्यार्थ्यांचा गोंधळ, गडबड दिसुन आला. पोलीस कर्मचारी व होमगार्ड गैरहजर दिसुन आले.परीक्षा कक्षात क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी आढळून आले. एकाच बाकावर तीन तीन विद्यार्थी बसलेले दिसुन आले.

 

      या त्रुटीबाबत संबंधित शिक्षणाधिकारी मंगल धुपे व शाम देशमुख यांना संबंधित केंद्र प्रमुख यांना नोटिसा काढून कार्यवाही करण्याच्या तात्काळ सुचना मोबाईल वरून दिल्या याबाबत जिल्हाधिकारी यांनी सुध्दा कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या.

     या त्रुटीबाबत संबंधित परीक्षा केंद्र प्रमुख यांना निवासी उपजिल्हाधिकारी यांनी धारेवर धरून अश्या गैरप्रकारांना तात्काळ आळा घालण्याबाबत सक्त सुचना दिलेल्या आहेत. सदर परीक्षा कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात पार पाडव्यात परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होणार नाही याबाबत विद्यार्थी पालक, शिक्षक व संस्थाचालक यांनी दक्षता घ्याव्या  असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment