Wednesday 21 February 2024

शासकीय योजनांच्या प्रचार-प्रसिध्दी चित्ररथास जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दाखविली हिरवी झेंडी




जालना, दि. 21 (जिमाका) – विविध शासकीय लोककल्याणकारी योजनांच्या प्रचार-प्रसिध्दी  चित्ररथास जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते आज हिरवी झेंडी दाखवून चित्ररथ जनजागृतीसाठी रवाना करण्यात आला.  हा चित्ररथ जालना जिल्हयाच्या शहरी व ग्रामीण भागात जाणार आहे.‍  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आयोजित या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, जिल्हा रेशीम अधिकारी अजय मोहिते, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी रेश्मा चिमिंद्रे आदिंसह विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.

-*-*-*-*-


No comments:

Post a Comment