Tuesday 25 September 2018

गोवर रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी घेतला आढावा लसीकरणाबाबत अधिकाधिक जनजागृती करण्याचे आवाहन





          गोवर आणि रुबेला या आजारांपासून मुला-मुलींना सुरक्षित करण्यासाठी जिल्हयात गोवर रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहिम नोव्हेंबर महिन्यात राबविण्यात येत असून याबाबत करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आढावा तसेच लसीकरणाबाबत जनजागृती व्हावी यासाठी धर्मरुगुरुंसाठी बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते.  यावेळी जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पूर्वतयारीचा आढावा घेतला घेतला.
            यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) कमलाकर फड,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड, तहसिलदार संतोष बनकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. संतोष कडले, शहा आलम खान फिरोज खान, शेख रियाज गनी, काकड नसरुल्लाखान शफीउल्ला खॉ, शेख अफसर, शेख इमाम, श्रीमती कुरेशी हुर बी अब्दुल मजीद, श्रीमती शेख निामत बी अय्युब, श्रीमती आशा बेगम शेख चाँद, पठाण फेरोज खान हस्तेखान, शेख युनुस लालमियाँ, फय्याज खान पठाण, एजाज खान, श्रीमती रुगसाना अहेमद कुरेशी, श्रीमती आबेदा बी शेख महेबुब, शेख फरोज शेख अजीज, फरान फय्याज अन्सारी, श्रीमती कुरेशी नसरीन मुसा यांच्यासह विविध धर्माचे गुरु यावेळी उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले की, लहान वयाच्या मृत्युसाठी गोवर व रुबेला हे आजार मोठया प्रमाणात कारणीभूत ठरत असल्यामुळे केंद्र शासन व राज्य शासनाने राज्यात मोहिम राबविण्याचे निश्चित केले असून यासाठी आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला व बाल कल्याण, तसेच इतर विभागांनी एकत्रितपणे व समन्वयाने काम करण्याची गरज आहे. ग्रामीण भागात आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण तसेच ग्रामविकास विभागाची महत्वाची भूमिका राहणार आहे. प्रत्येक स्तरावरील यंत्रणांनी आपल्या अधिकार क्षेत्रातील पात्र मुला-मुलींची अचूक माहिती गोळा करतांना एकही पात्र बालक वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
            लसीकरणाबाबत जनजागृती होण्यासाठी मदरसामधील 15 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांबरोबरच सर्व धार्मिक संस्थांनी त्यांच्याकडे होणाऱ्या बैठकांच्या माध्यमातुन तर सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये लसीकरणाबाबत नागरिकांना महत्व पटवून देण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी  श्री बिनवडे यांनी यावेळी केले.
            यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड यांनी लसीकरणाबाबत करण्यात आलेल्या पूर्वतयारीची जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली तर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कडले यांनी गोवर रुबेला लसीकरण मोहिमेमध्ये अल्पसंख्याक संस्था, मदरसा प्रमुख यांच्या सहभागाचे महत्व पटवुन दिले. डॉ. दीपाली गायकवाड यांनी गोवर रुबेला लसीकरण मोहिमेबाबत सविस्तर असे सादरीकरण केले.
            यावेळी जिल्हा अल्पसंख्याक कल्याण समितीच्या कामाचाही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी आढावा घेतला.
*******


No comments:

Post a Comment