Monday 3 September 2018

जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध - पालकमंत्री बबनराव लोणीकर





जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध
                             - पालकमंत्री बबनराव लोणीकर
        जालना, दि. 3 –   जिल्ह्यातील जनतेला रस्ते, वीज, पाणी, आरोग्य यासारख्या सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच संपूर्ण जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.
            परतूर तालुक्यातील दैठणा खु. येथे प्रादेशिक पर्यटन विकास आराखड्यांतर्गत मंजुर असलेल्या एक कोटी 54 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
            व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहुल लोणीकर, रमेश भापकर, रामेश्वर तनपुरे, बद्रीनाथ ढवळे, अशोक बरकुले, सतीश निर्वळ, नितीन जोगदंड, सुरेश सांळुके, प्रभाकर सवणे, रामजी कचरे, राजाभाऊ कचरे, दत्ताभाऊ सवणे,महमुदभाई, संतपराव टकले आदींची उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, दळणवळणामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या रस्ते विकासासाठी मंत्रीपदाची धुरा सांभाळताच आपण जिल्ह्यातील संपुर्ण रस्त्यांची माहिती घेऊन पुढील पाच वर्षात करावयाच्या रस्त्यांचे आराखडे तयार करण्याचे निर्देश त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते.  गेल्या तीन वर्षाच्या काळात 200 गावांमध्ये पक्के व डांबरी रस्ते तयार करण्यात आली आहेत.  गावांना रस्ते व्हावेत,  शेतकऱ्यांना त्यांचा माल वेळेवर बाजारामध्ये नेण्याबरोबरच सर्वसामान्य जनतेला जलदगतीने वाहतुक करता यावी यासाठी मतदारसंघातील प्रत्येक गावात रस्ते तयार करण्यात येत आहेत.  या रस्त्यांचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देश कंत्राटदारांना देण्यात आले आहेत.  येणाऱ्या पाच वर्षात हा रस्ता खराब झाल्यास तो दुरुस्त करण्याची जबाबदारीही या कंत्राटदारांवर निश्चित करण्यात आली असुन येणाऱ्या काळात जिल्ह्यातील वाडी,वस्ती, तांडे व गावांमध्ये पक्क्या, दर्जेदार व मजबुत रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री  श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            जिल्ह्याच्या रस्ते विकासासाठी केंद्र शासनामार्फत मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे. या माध्यमातून शहरांसह ग्रामीण भागात दर्जेदार रस्त्यांची निर्मिती करण्यात येत आहे.  शंभर गावात पक्के व डांबरी रस्त्याचे जाळे निर्माण करण्यात आले असुन  राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत दिंडी मार्ग म्हणून खामगाव-लोणार-मंठा-परतूर-माजलगाव-कळंब-बार्शी-पंढरपुर-सांगोला या 430 किलोमीटरच्या रस्त्याचे काम अत्यंत वेगाने करण्यात येत आहे.  हा मार्ग पुर्ण झाल्यास  परिसराचा विकास होण्याबरोबरच बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत.  शेगाव ते पंढरपूर मार्गे जालना या मार्गावर गतकाळात अपघातामध्ये वारकऱ्यांना प्राण गमवावे लागले होते. विदर्भातील प्रत्येक भाविकांना पंढरपूर या श्रद्धास्थानापर्यंत  कमी वेळात पोहोचता यावे यासाठी नवीन दिंडी मार्ग होणे आवश्यक होते. त्यामुळे शेगाव ते पंढरपूर मार्गे लोणार-परतूर-माजलगाव हा मार्ग व्हावा अशी मागणी वेळोवेळी  नागपूर व दिल्ली येथे जाऊन  केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केल्याने हा रस्ता तातडीने मंजूर करण्यात आला असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            शेतकऱ्यांप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजनेच्या माध्यमातुन प्रयत्न करण्यात येत असुन छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली असुन त्यापैकी 1 लाख 32 हजार 447 लाभधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर 648 कोटी 52 लक्ष इतकी रक्कम जमा करण्यात आली असुन उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येत आहे.  जिल्ह्यातील 96 हजार 56 शेतकऱ्यांना 655 कोटी 54 लक्ष रुपये पीककर्जाचे वाटप करण्यात आले असुन जालना जिल्हा मराठवाड्यात पीककर्ज वाटपात प्रथम क्रमांकावर आहे.  बोंडअ ळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने 275 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असुन त्यापैकी 183 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.  तसेच पीकविम्यापोटी 5 लाख 64 हजार शेतकऱ्यांना 176 कोटी 81 लक्ष रुपयांचे वाटप करण्यात आले असल्याची माहितीही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी दिली.
            उपकेंद्रावर तसेच ट्रान्सफॉर्मरवर विजेचा अतिरिक्त ताण पडल्याने नागरिकांना व शेतकऱ्यांना पुरेसा विजेचा पुरवठा करण्यात अडचणी येत होत्या. या प्रश्नावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी वीज वितरणामध्ये अत्यंत महत्वाचा घटक असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीवर शासनाने भर दिला असून जिल्ह्यातील जनतेला व शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला सुरळीतपणे वीजेचा पुरवठा होण्यासाठी जिल्ह्यासाठी नवीन 33 केव्हीचे 49 उपकेंद्रे मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी 19 उपकेंद्राच्या उभारणीचे काम सुरु झाले असून 170 कोटी रुपये खर्चून जालना येथे 220 केव्ही केंद्राचे काम करण्यात येत आहे. तर परतूर येथील 220 केव्ही केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर 132 के.व्ही.च्या नवीन 4 केंद्राचा प्रस्ताव असून ही सर्व कामे पूर्ण झाल्यास जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला अखंडितपणे विजेचा पुरवठा होणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            तेलंगणा, आंध्रप्रदेश, श्रीलंका व गुजरात राज्य तसेच इस्त्राईल देशाच्या धर्तीवर जालना, परतूर व मंठा या तालुक्यातील 176 गावांना वॉटरग्रीडच्या माध्यमातून शुद्ध व स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी 234 कोटी रुपयांची योजना साकारली जात आहे.  त्याचबरोबरच मतदासंघातील 92 नवीन गावांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला असुन यासाठी 125 कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. येत्या वर्षभराच्या कालावधीत ही योजना पूर्ण करुन जालना, परतूर व मंठा तालुक्यातील गावांना शुद्ध व स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार असुन येणाऱ्या काळात घनसावंगी तालुक्यातील राजाटाकळी, जिरडगाव, कुंभारपिंपळगाव व रांजणी सर्कलमधील गावांना वॉटरग्रीडद्वारे शुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याबरोबरच दर्जेदार रस्ते करण्याचा मानस असल्याचेही पालकमंत्री  श्री.लोणीकर यांनी यावेळी सांगितले. 
            मतदार संघातील तीनशे गावांना येणाऱ्या काळात रस्ते, वीज, पाणी यासारख्या मुलभूत सोई-सुविधा पुरविण्यात येणार असुन गावात होणाऱ्या प्रत्येक विकास कामांना गावकऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी केले.
            पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते परतूर तालुक्यातील कावजवळा येथे अर्थसंकल्प अंतर्गत परतूर-रांजणी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या 3 कोटी रुपये किंमतीच्या कामाचा तसेच ब्राम्हणवाडी येथे मुख्यमंत्री ग्रामसडक व प्रादेशिक पर्यटन विकास आराखड्यांतर्गत मंजूर असलेल्या एक कोटी 65 लक्ष रुपयांच्या विविध कामांचाही शुभारंभ करण्यात आला.
 कावजवळा येथे झालेल्या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहुल लोणीकर, रमेश भापकर, रामेश्वर तनपुरे, डिंगबर मुजमुले, पंजाबराव बोराडे, शहाजी राक्षे,अंकुश आबा कदम, शेख रहोमोदिन, सुरेश दादा साळुके, रमेशराव केवारे, शेख आयुबभाई, श्रीपाद तरासे, संरपच सोमनाथ मगर, उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, कार्यकारी अभिंयता श्री सोनलकर हे तर ब्राम्हणवाडी येथे झालेल्या कार्यक्रमास राहुल लोणीकर, मदनलाल शिंगी, रिझू सोळंके, मानिकराव वाघमारे, नाथा जिजा, रामप्रसाद थोरात, रंगनाथ येवले, मुरली काका, बाळासाहेब  तात्या, विष्णु अण्णा सोळुंके, विलास सोळुंके, तुकाराम सोळुंके, अण्ण्णासाहेब ढवळे, अमोल तौर, विष्णु शहाणे, बाबासाहेब थोरात, तुकाराम सोळुंके, सतीश देशमुख, सुधाकर सोळुंके   यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*******



No comments:

Post a Comment