Tuesday 28 August 2018

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न



जालना, दि. 28 –  जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हापुरवठा अधिकारी राजीव नंदकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
            बैठकीस प्रा. डॉ. रेणुका भावसार, संध्या संजय देठे, भाग्यश्री जगताप, मोहन नेहेरे, श्री गवारे, मिठू किसनराव आगलावे, माधवराव पात्रे, रवींदग गोल्डे, मीरा आरगडे, शेख वसीम तंबोळी, बी.एम. देशमुख, संदीप काबरा, विजय जाधव, विमलताई आगलावे, जी.व्ही. बागल, चंद्रमणी शंकरराव खरात, मोहन इंगळे, महावितरणचे किरण म्हेत्रे, बीएसएनएलचे गोपाल शं पेम्बार्ती, भावना आफळे,   आदींची उपस्थिती होती.
            यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी श्री नंदकर म्हणाले की, जालना जिल्ह्यात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेमार्फत स्वस्त धानय्‍ दुकान, गॅस एजन्सी, पेट्रोल पंप, दुकाने यांची तपासणी करण्यात येणार असुन ग्राहक व त्यांचे संरक्षण याबाबत सप्टेंबर महिन्यात कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असुन या जिल्हा ग्राहक संरक्षणपरिषदेच्या माध्यमातुन ग्राहकांचे प्रश्न तडीस लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही श्री नंदकर यांनी यावेळी सांगितले.            
            जालना शहरामध्ये रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे.  वाहनधारकांसह नागरिकांना या रस्त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत असुन या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. दारिद्रय रेषेखाली देण्यात येणाऱ्या धान्याबाबत नागरिकांना माहिती होत नसुन धान्याच्या दराची माहिती असलेले फलक प्रत्येक रेशन दुकानावर लावण्यात यावेत. बदनापूर शहर हे हायवे लगत असलेले गाव असुन या ठिकाणी लोकसख्ंयाही मोठ्या प्रमाणात आहे.  परंतू या ठिकाणी सार्वजनिक शौचालयांचा अभाव असुन यामुळे अनेकवेळा रस्त्यावर नागरिका शौचास बसलेले दिसतात.  त्या ठिकाणी तातडीने सार्वजनिक शौचालयांची उभारणी करण्यात यावी. प्रत्येक पेट्रोल पंपावर मोफत हवा देण्यासाठी मशिन्स बसवलेल्या आहेत. परंतू या मशिन्स निकामी असुन याचा वापर होताना दिसत नाही.  या मशिन्स कार्यान्वित करण्यासाठी सर्व पेट्रोलपंप धारकांना सुचना देण्याबरोबरच आधारकार्डची नोंदणी करण्यासाठी महा-ई सेवा केंद्रामार्फत नागरिकांकडून अतिरिक्त पैशाची मागणी करण्यात येते.  याबाबतही योग्य ती कार्यवाही करावी आदी मागण्या यावेळी सदस्यांनी नोंदवल्या. 
            यावेळी राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवर राज्यपालांद्वारे अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल डॉ.प्रा. रेणुका भावसार यांचा जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदकर यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
*******

No comments:

Post a Comment