Thursday 2 August 2018





शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीची दुरुस्ती करुन
इमारत मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या वसतीगृहासाठी उपलब्ध करुन द्या
                                                  -- पालकमंत्री बबनराव लोणीकर
जालना दि. 2 -  जिल्ह्यातील मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी निवासी वसतीगृहासंदर्भात राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांची शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेऊन शिवाजी पुतळा परिसरात असलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीची दुरुस्ती करुन ही इमारत विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाची उपलब्ध करुन देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, उप विभागीय अधिकारी केशव नेटके, अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुरेश बेदमुथा, तहसिलदार बिपीन पाटील, नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री खांडेकर आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, जालना शहराच्या मध्यभागी जुने शासकीय विश्रामगृह दोन एकर परिसरात असुन या ठिकाणी स्वतंत्र इमारत उपलब्ध असुन  या ठिकाणी आठ कक्ष आहेत.  त्याचबरोबर कर्मचाऱ्यांसाठीचे 32 निवासस्थानेही आहेत.  या ठिकाणी विद्यार्थ्यांची चांगल्या प्रमाणात सोय होणार असुन या ईमारतीची डागडुजी करुन ही इमारत तातडीने वसतीगृहासाठी उपलब्ध करुन देण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
राष्ट्रीय रुरबन मिशनच्या कामाचा पालकमंत्र्यांकडून आढावा
राष्ट्रीय रुरबन मिशनच्या माध्यमातुन परतुर तालुक्यातील  16 गावांचा सर्वांगिण विकास करण्यात येत असुन या योजनेंतर्गत शेतकऱ्यांसाठीची मिनी एमआयडीसीही तयार करण्यात येणार आहे.  शेतकऱ्यांनी पीकविलेल्या मालावर प्रक्रिया करणारे 100 उद्योग या एमआयडीसीमध्ये सुरु करण्यात येणार असुन या विविध कामांचा राज्याचे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते लवकरच शुभारंभ करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
मानवविकास मिशनअंतर्गत जालना जिल्ह्यातील मुलींना शाळेत पोहोचण्यासाठी 56 बसेस शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.  मुलींना शिक्षणासाठी  जाण्या-येण्याची सोय व्हावी यासाठी परतूर तालुक्यातील सात बसेस एस.टी. महामंडळाला उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.  मुलींची संख्या पहाता मंठा व परतूर तालुक्यासाठी प्रत्येकी एक बस आणखी आवश्यक असल्याने या बसेस संदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे शिक्षण विभागाला त्यांनी यावेळी निर्देश दिले.  मतदारसंघातील 200 गावात डांबरी रस्ते तयार करण्यात आलेले असुन आजही अनेक गावात एस.टी. बसच्या फेऱ्या होत नाहीत.  ज्या गावात बससेवा उपलब्ध नसेल त्या गावांना तातडीने बससेवा उपलब्ध करुन देण्याबाबतही एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी सुचना केल्या.

सर्व्हे क्र. 488 येथील विश्रामगृहाचा गैरवापर होत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. यावर आळा घालण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सुचना देत अशाप्रकारचे गैरप्रकार या ठिकाणी आढळून आल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची तंबीही त्यांनी यावेळी दिली.
बैठकीस संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
तत्पूर्वी पालकमंत्री श्री लोणीकर यांनी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या वसतीगृहासाठी भूविकास बँकेची इमारत, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र तसेच शिवाजी पुतळयाजवळ असलेल्या जुन्या शासकीय विश्रामगृहाची प्रत्यक्ष भेट देऊन पहाणी केली.
यावेळी मंत्री महोदयांसमवेत माजी आमदार अरविंद चव्हाण, भुजंगराव गोरे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्या, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, एन.व्ही. आघाव, तहसिलदार बिपीन पाटील यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे प्रमख अधिकारी उपस्थित होते.
*वृत्त क्रमांक:- 491                                                                                              दिनांक: 2-8-2018

 हदयप्रत्यारोपन शस्रक्रिया यशस्वी होऊन परतलेल्या धनश्री मुजमुलेची
पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी घेतली भेट-
 पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या भेटीने भारावले मुजमुले कुटुंब

            जालना, दि. 2 -   जालना येथील पाच वर्षे वयाच्या धनश्रीवर हदयप्रत्यारोपन शस्रक्रियेसाठी आर्थिक मदत केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख ओमप्रकाश शेटे यांचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी आभार व्यक्त करत  धनश्रीची आज प्रत्यक्ष भेट घेतली.
            जालना येथील सर्वसामान्य कुटुंबातील धनश्री कृष्णा मुजमूले वय 5 वर्ष हिच्यावर दि.22 जुन रोजी मुलुंड (मुंबई) येथील फोर्टिस हॉस्पिटल येथे यशस्वी हदय प्रत्यारोपन शस्रक्रिया झाली. 40 दिवस हॉस्पीटल मध्ये राहिल्यानंतर धनश्री दि.29 जुलै रोजी जालन्यात परतली. आज राज्याचे पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी धनश्रीच्या जालना येथील निवास्थानी भेट देऊन धनश्रीच्या जवळ जाऊन आपुलकीने तीच्या प्रकृतीची विचारपूस केली व ईश्वराकडे धनश्रीच्या सूदृढ आरोग्यासाठी प्रार्थना केली
*******




No comments:

Post a Comment