Wednesday 25 May 2022






महाराष्ट्राच्या प्रगतीत वित्तीय संस्थांचा मोलाचा वाटा
-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            जालना, दि. 4 :- महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीत वित्तीय संस्थांचा मोलाचा वाटा असून नागरिकांच्या आर्थिक गरजा  पूर्ण करण्यासाठी वित्तीय संस्था  महत्त्वाची भूमिका बजावतात असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले देवगिरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन इमारतीचे उदघाटन  कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
            यावेळी  राज्याचे  पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार रावसाहेब दानवे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, संतोष दानवे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर आदी मान्यवर उपस्थित होते.
            मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, महाराष्ट्रात सहकार क्षेत्र तळागाळापर्यंत पोहचल्यामुळे वित्तीय संस्थांचे जाळे तयार झाले आहे. राज्याचा सर्वसमावेशक विकास हा वित्तीय संस्थांच्या माध्यमातून होत आहे. जनधन योजनेच्या माध्यमातून देशातील 32 कोटी लोकांना थेट लाभ मिळाला असून नागरिकांच्या खात्यावर विविध योजना आणि अनुदांनाच्या रक्कमा थेट जमा होत आहे. हे वित्तीय संस्थांच्या सहभागामुळेच शक्य झाले आहे. तसेच वित्तीय संस्थांकडून नागरिकांना चांगली वागणूक मिळत असल्याने वित्तीय व्यवहारात पारदर्शकता आणि जनेतमध्ये वित्तीय संस्थांबाबत विश्वार्हता निर्माण झाली आहे. विश्वस्त व्यवस्थेतून जे विधायक काम होते ते राज्याला प्रगतीच्या दिशेने नेण्यास निश्चितच मदत करीत आहे असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
            देशाच्या तसेच राज्याच्या प्रगत भागात वित्तीय संस्थांचे मोलाचे योगदान आहे. या संस्थांच्या माध्यमातून नागरिकांना कर्ज पुरवठा केला जात असून विविध क्षेत्रात प्रगती होत आहे. सहकारी संस्थांनी समाजामध्ये कौटूंबिक आणि जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले आहे असेही ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्र सहकार  परिषदेच्या त्रैवार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.
            तत्पुर्वी गांधी चमन येथील देवगिरी नागरी  सहकारी पतसंस्थेच्या नवीन इमारतीचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी पतसंस्थेची पाहणी करुन संचालक मंडळाशी चर्चा करुन पतसंस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार रावसाहेब दानवे, आ. नारायण कुचे, संतोष दानवे आदी मान्यवर उपस्थित होते.
-*-*-*-*-*-*

No comments:

Post a Comment