Tuesday 31 May 2022

चांगले आरोग्य राखण्यासाठी तंबाखू खाणे टाळावे – अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे विविध स्पर्धा, व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून तंबाखू विरोधी जनजागृती

 





 

जालना, दि. 31 (जिमाका) – चांगले आरोग्य राखण्यासाठी तंबाखू खाणे टाळावे, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी केले. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणा-या क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, औरंगाबाद सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना आणि जिल्हा प्रशासन जालना यांच्या संयुक्त विद्यमाने व धरतीधन ग्रामविकास संस्था यांच्या सहकार्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, समाज कल्याण कार्यालय, जालना येथे आज आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्री. पिनाटे बोलत होते.

कार्यक्रमास दंत शल्य चिकित्सक डॉ. अतुल देशमुख, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र गायके, एनटीपीसी जिल्हा समन्वयक संदीप गोरे, नर्सिंग कॉलेजच्या प्रचार्या सुनिता रायकर, एमसीईडीच्या प्रकल्प अधिकारी भारती सोसे, बार्टीचे जिल्हा समन्वयक मुंजाजी कांबळे, क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, औरंगाबादचे प्रबंधक संतोष देशमुख, धरतीधन ग्राम विकास संस्था, जालनाचे अध्यक्ष मिलिंद सावंत, समुपदेशक सोनाजी भुतेकर उपस्थित होते.

यावेळी रांगोळी, प्रश्नमंजुषा, चित्रकला स्पर्धा, व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  डॉ. अतुल देशमुख, डॉ. राजेंद्र गायके, संदीप गोरे यांनी उपस्थितांना तंबाखू, धुम्रपान आणि गुटखा आदी सारख्या आरोग्यास घातक सवयी आणि त्यांच्या दुष्परीणामांबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष देशमुख यांनी केले, सूत्रसंचालन मिलिंद सावंत यांनी केले व आभार प्रदर्शन सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी, प्रदीप पवार यांनी केले. कार्यक्रमा दरम्यान केंद्र शासनाचे पंजीकृत कलापथक शाहीर परिहार आणि संच, जालना यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे तंबाखू विरोधी विषयावर जनजागृती करण्यात आली.

यावेळी आयोजित चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धेत नर्सिंग कोलेज च्या सर्व विद्यार्थिनींनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला. यातील चित्रकला स्पर्धेतील भाग्यश्री गणेश रेटावाल, शितल सखाराम राउत, वैष्णवी निवृत्ती वायाळ आणि कांचन गजानन भारसाकळे यांनी, रांगोळी स्पर्धेतील भाग्यश्री रेटावाल, शितल राउत, निकिता मोरे, भारती कातीरे, निकिता करपे, आणि अन्विता साळवे यांनी आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेतील अपूर्वा संदीप आल्हाद, प्रमोद सोनुने, जाकिर शेख, डॉ. जालिंदर प्रभाकर ढिल्पे आणि कोमल आल्हाद मधाडे या पुरस्कार विजेत्यांना क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, औरंगाबाद तर्फे बक्षीस व आरोग्य विभागातर्फे प्रमाणपत्र देऊन पुरस्कृत करण्यात आले. यावेळी सर्वांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरोचे प्रदीप पवार, प्रिती पवार, राहुल मोहोड आणि प्रभात कुमार, धरतीधान ग्राम विकास संस्था चे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

-*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment