Friday 27 May 2022

लेख स्वच्छता पाळा, मलेरिया टाळा

 


 

            मलेरिया (हिवताप) हा संसर्गजन्य नसला तरी तो कोणालाही होऊ शकतो.  या आजाराच्या लक्षणांमध्ये ताप, घाम येणे, थंडी वाजून येणे, डोकदूखी, अस्वस्थता, स्नायू दुखणे, मळमळ आणि उलट्या यांचा समावेश होतो. मलेरिया हा एक धोकादायक विषाणु आहे. जो डासाच्या माध्यमातून पसरतो. मलेरियाने आतापर्यंत लाखो लोकांचे प्राण घेतले आहे.

मलेरिया हा एक टाळता येण्याजोगा आजार आहे.  मलेरिया हा डासाच्या  चावण्यामुळे होणारा रोग आहे. याचा प्रादुर्भाव विषवृत्तीय भागात जास्त आहे. हा रोग अनेक शतकापासून अस्तिवात आहे. ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात हिपोक्रॅटिस यांना मलेरिया सदृश्य आजार माहीत होता.  वैयक्तिक व परिसरात स्वच्छता पाळल्यास मलेरिया टाळता येऊ शकतो.

सतराव्या शतकाच्या पुर्वार्धात, जैलुइट लोकांना पेरु देशात सिकोंणा ही वनस्पती आणली होती. या सुमारास जेव्हा युरोपमध्ये फार मोठ्या प्रमाणात मलेरियाची साथ आली होती. तेव्हा या सिकोंणा वनस्पतीच्या उपचारामुळे मलेरिया आणि अन्य प्रकारचे ताप यातील फरक सिडनर्हेम आणि अन्य वैधता ओळखणे शक्य झाले.

 1894 मध्ये मॅनसन यांनी असे गृहीतक मांडले कि, मलेरिया हा रोग डासांमुळे होत असून तो जंतूनी युक्त डास चावा घेऊन नव्हे तर पाण्यावाटे पसरवीत असावेत पुढे 1898 मध्ये रॉस यांनी मलेरिया डासामुळे नेमका कसा होतो याचा शोध लावला. पक्षामधील मलेरिया प्रमाणेच मानवी शरीरातही घडामोडी होत असल्या पाहिजेत असे त्यांना दिसून आले. त्या वर्षी ग्रासी, बिगनमी आणि बस्टीनेली यांनी ॲनाफेलिस जातीच्या डासामध्ये प्लाझामोडीअम फॉल्सिपॅरम या जातीच्या मलेरियाच्या जंतुची ‍ कशी वाढ होते आणि पुढे ते सांसर्गिक डास चावल्यामुळे माणसामध्ये मलेरिया कसा होतो हे दाखवून दिले.

दि. 25 एप्रिल हा दिवस  जगभरात  मलेरिया दिन म्हणून साजरा केला जातो. 2008 मध्ये आफ्रिकेत हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला. मलेरिया या साथीच्या आजाराने आजवर जगभरात अनेकांचा बळी घेतला आहे. जागतिक मलेरिया दिन 2022 ची थीम आहे मलेरियाचे ओझे कमी करण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी नावीन्यपूर्ण उपचार करावा.

मलेरियाचा आजार टाळण्यासाठी पुढीलप्रमाणे उपयायोजना कराव्यात - खिडक्या आणि दारावर पडदे लावावेत. डासांची अगरबत्ती किंवा इतर रोधकांचा वापर करावा. अंधार पडू लागताच हात व पाय झाकणारे कपडे घालावेत. गर्भवती स्त्रीयांसाठी आणि मुलांसाठी हे विशेष आवश्यक आहे. जेथे कोठे पाणी थांबले असेल तेथील जागा कोरडी करावी. पाण्याची भांडी आणि टाक्या झाकून ठेवाव्यात. घराच्या जवळपासची झाडी-झुडुपे उपटून टाकावीत. परिसरात कुठेही पाणी साठू देऊ नये. साठलेले घाण पाण्यावर मोठया डासांची उत्पत्ती होते, अशा ठिकाण स्वच्छ करणे आवश्यक आहे.  या गोष्टीचे पालन केल्यास मलेरिया  आजार होणार नाही. जर मलेरियाची लक्षणे आढळलीच तर  डॉक्टरांना तात्काळ दाखवून उपचार घ्यावा.

जिल्हा माहिती कार्यालय,

 जालना

-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment