Friday 27 May 2022

पंडीत दिनदयाळउपाध्याय रोजगार मेळाव्याचे 28 मे रोजी जालना येथे आयोजन

 


 



 

    जालना दि. 27 (जिमाका) :-    जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,जालना यांचे मार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त आयोजित  पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा दिनांक 28 मे,2022 शनिवार रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 4.00 वाजपर्यत मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे अंकुशराव टोपे महाविद्यालय, सिरसवाडी रोड, रेल्वे उड्डाण पुलाशेजारी, जालना येथे आयोजित करण्यात आला आहे.  या मेळाव्याच उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याहस्ते होणार आहे.

    एसएससी, एचएससी, आयटीआय, ग्रॅज्युएट्‌स, इंजिनिअर्स  यांचेसाठी एकूण  733 रिक्तपदे उपलब्ध असून मुलाखतीसाठी विविध 7 कंपन्यांचे  प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

             या रोजगार मेळाव्यामध्ये  चाकण, पुणे येथी महिद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा लि. यांची अप्रेंटिस व ट्रेनी म्हणून आयटीआय फिटर,वेल्डर, इलेक्ट्रिशियन,डिजेल मेकॅनिक,मोटर मेकॅनिक,शिट मेटल वर्कर एकुण 130 पदे आणि दहावी, बारावी , डिप्लोमा व पदवीधर यासाठी एकुण 370 पदे आहेत.

          नवभारत फर्टिलाजर, औरंगाबाद यांची सेल्स ट्रेनी म्हणून दहावी, बारावी व पदवीधर यांचेसाठी एकुण 101 पदे आहेत. जालना येथील विनोदराय इंजिनिअरिंग यांचेकडे ट्रेनी ऑपरेटर आयटीआय वेल्डर,शिट मेटल,फिटर  एकुण 6 पदे आणि ट्रेनी डिजायनर, इंजिनियरींग पदवी (बी.ई.,बी.टेक-मेकॅनिकल किंवा एम.ई.,एम.टेक-मेकॅनिकल) यांची 2 पदे आहेत. जालना येथील विक्रम टी प्रोसेसर प्रा.लि. यांचेकडे मशिन ऑपरेटर 4 पदे (दहावी व आयटीआय मशिनिष्ट), इलेक्ट्रीशन -1, मशिनिष्ट -1 व सॉप्टवेटर डेव्हलपर 1 , आणि अकाउंटंट 3 पदे (वाणिज्य पदवी आणि 24 महिने अनुभव  आवश्यक)  आहे. एल.जी.बालकृष्ण अँड ब्रदर्स प्रा.लि. जालना यांचेकडे  कॅज्युअल इपीपी ट्रेनी म्हणून 100 पदे (पात्रता दहावी ,बारावी, पदवीधर) आहेत. एन.आर.बी. लिमिटेड जालना यांचेकडे इपीपी ट्रेनी म्हणून 7 पदे ( पात्रता दहावी आणि आयटीआय टर्नर, फिटर,ग्रायंडर,मॅकेनिस्ट) आहेत. माळाचा गणपती येथील  ठाकुरजी सोलवेक्स प्रा.लि. जालना यांचेकडे अकाउटंट 2 पदे (वाणिज्य पदवी आणि टॅली), ट्रेनी 2 पदे (आयटीआय मॅशिनिस्ट), सिव्हिल इंजिनिअर 1 पद (बीई/बीटेक सिव्हील) इलेक्ट्रिशि2 पद (आयटीआय इलेक्ट्रिशीयन ),सॉप्टवेअर डेव्हलपर 1 पद( बीसिए,एमसिए)  अशी एकूण 733 रिक्तपदे प्राप्त झाली आहेत. या मेळाव्यासाठी वरील 7 नामांकित कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी उपस्थित राहणार असुन पात्र उमेदवारांच्या चाचणी मुलाखती घेऊन विविध पदांसाठीच्या रिक्त जागांसाठी निवड भरती करणार आहेत.

 

                      या सुवर्ण संधीचा बेरोजगार उमेदवारांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा. तसेच, रोजगार  इच्छुक उमेदवारांनी याचा लाभ घेण्यासाठी किमान पाच प्रतीत बायोडाटा फोटो आणि आधार कार्ड,सेवायोजन नोंदणीसह उपस्थित रहावे. नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्याप पर्यत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच, यापुर्वी महारोजगार वेब पोर्टलवर नोंदणी केली असल्यास वरील सुधारीत संकेतस्थळावर आपला 15 अंकी नोंदणी क्रमांक टाकून लॉगीन करावे आणि मोबाईल आधार क्रमांक पडताळणी करावी. तसेच, या वेबपोर्टलवर लॉग-इन करुन जॉब फेअर टॅबवर  क्लिक करुन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय  रोजगार मेळावा 1 (2022-2023)  या मध्ये जाऊन पात्रतेप्रमाणे विविध कंपन्याच्या उपलब्ध रिक्तपदांसाठी अ‍ॅप्लाय करावे, यासाठी काही अडचण आल्यास कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक 02482-299033 वर संपर्क करावा. या मेळाव्यास नोकरी इच्छूक उमेदवारांनी  उपस्थित राहुन  मुलाखती द्याव्यात आणि या रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संपत चाटे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता, जालना यांनी केले आहे.

 

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment