Wednesday 25 May 2022

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबाबत महाविदयालयांना आवाहन

 


 

जालना दि. 25 (जिमाका) :-  शासकिय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतू शासकिय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या किंवा शासकिय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांपैकी इयत्ता 11 वी,12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात/शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शासकिय वसतिगृहातील मुला-मुलींप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी शासन निर्णय दि. 13 जून 2018 अन्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे.

 

या योजनेंतर्गत सन 2020-21 मधील विद्यार्थ्यांना संपुर्ण वर्षभराचा लाभ देय ठरतो महाविद्यालयाने सन मधील 2020-21 स्वाधार योजनेंतर्गत सादर केलेल्या विदयार्थ्याची अर्जांची पात्र यादी व त्रुटी यादी यापूर्वीच सर्व सबंधीत महाविदयालयांना कळविण्यात आली आहे व सदर याद्या नोटीस बोर्ड वर लावण्यात आल्या आहे. पात्र विदयार्थ्याची वार्षिक उपस्थिती महाविद्यालयाने देणे आवश्यक आहे. महाविद्यालयाने उपस्थिती सादर केल्यास त्या विद्यार्थ्यांना त्या वर्षाचा वार्षिक 12 महिन्यांचा लाभ देता येणार आहे. मा. आयुक्तालयाच्या दि. 31 डिसेंबर 2021 मधील पत्रात नमूद केल्यानुसार विद्यार्थ्याची महाविद्यालयीन उपस्थित 75 टक्के आवश्यक आहे. याबाबत संबंधित संस्थेचे विहीत नमून्यातील उपस्थिती पत्रक सादर करावे. कोविड-19च्या प्रादूर्भावामुळे सर्व शैक्षणिक संस्था महाविद्यालय बंद करण्यात आल्या असल्या तरी सन 2020-21 व सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू होते. तरी सदर कालावधीतील संबंधित पात्र यादीतील विद्यार्थ्यांची वार्षिक उपस्थिती व त्रुटी यादीतील विदयार्थ्याची त्रुटीची पुर्तता महाविद्यालयाने दिनांक 29 मे 2022 पर्यंत सहायक आयुक्त समाज कल्याण, जालना या कार्यालयास सादर करावीत, असे आवाहन समाज कल्याणचे, सहाय्यक आयुक्त अमित घवले यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment