Thursday 26 May 2022

कर्ज रकमेचा एकरकमी भरणा केल्यास व्याज रकमेत 50 टक्के सवलत

 


       

        जालना, दि. 26 (जिमाका) :-  ओबीसी महामंडळाच्या थकित कर्ज प्रकरणात संपूर्ण थकित कर्ज रकमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकित व्याज रकमेत 50 टक्के  सवलत देण्याबाबतची एकरकमी  परतावा (OTS) योजना दि. 31 मार्च  2023 पर्यंत राबविण्यात येत आहे.  त्यानुसार , महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थ्यांनी सदर योजनेचा फायदा घेवून कर्ज मुक्त व्हावे.

       महाराष्ट्र्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित , मुंबई यांचे जिल्हा कार्यालय, जालना यांचे मार्फत विविध कर्ज योजनेअंतर्गत जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील लाभर्थींना स्वयंरोजगाराकरिता अल्प व्याजदराने कर्ज वितरीत केले आहे. जिल्हा कार्यालयाकडुन वाटप झालेल्या थकीत लाभार्थींना जाहीर आवाहन करण्यात येत आहे, महामंडळाकडुन थकीत व्याज दरात 50 टक्के सवलत  दि. 31 मार्च 2023 पर्यंत देण्यात येणार आहे. या एकरक्कमी परतावा योजनेचा लाभ घेवुन सर्व संबधित लाभार्थ्यींनी थकीत मुद्दल व व्याज रकमेचा भरणा करुन कर्ज खाते बंद करण्यासाठी जिल्हा कार्यालय , महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित , डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन , जिल्हाधिकारी कार्यालयासमोर , जालना येथे संपर्क करण्याचे आवाहन -भिमराव मुगदल जिल्हा व्यवस्थापक, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-*-

-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment