Saturday 3 October 2020

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे अंबड तालुक्यात अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतपीकांची पालकमंत्री राजेश टोपे यांच्याकडून पहाणी

 





जालना, दि. 3 -  अंबड तालुक्यामध्ये अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतपिकांची व फळपीकांची राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी शेतीला प्रत्यक्ष भेट देत झालेल्या नुकसानीची पहाणी करुन उपस्थित शेतकऱ्यांकडून झालेल्या नुकसानीची माहिती घेऊन शासन शेतकऱ्यांप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन काम करत असुन शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

या पहाणी प्रसंगी उप विभागीय अधिकारी शशीकांत हदगल, तहसिलदार विद्याचरण कडवकर, भाऊसाहेब कनके, सतीषराव होंडे, भैय्यासाहेब हातोरे, बाळासाहेब नरवडे, बापुराव खरवटे, रईस बागवान, विकास कव्हळे, किरण तारक, सुरेश औटे, किशोर हातोडे, विश्वंभर गादवे, संजय कणके, सहदेव भारती, जिल्हा परिषदेचे कृषिविकास अधिकारी भीमराव रणदिवे, कृषि अधिकारी श्री वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री श्री टोपे यांनी अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव येथील शेतकरी दिगांबर जरांगे व सदाशिव चत्रे  यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची पहाणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधत झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. बळेगाव येथील शेतकरी बबन शंकरराव निकम यांच्या शेतातील कापुस तर ईस्माईल शेख नांदा यांच्या शेतीतील ऊसाची, धर्मराज एकनाथ मतकर यांच्या शेतीतील मुग पिकाची पहाणी केली. दह्याळ येथील बप्पासाहेब गारोळे यांच्या शेतातील कापुस, भांबेरी गावातील बाबासाहेब तुकाराम केजभट यांच्या शेतातील मुग, केदार टरमाले यांच्या शेतातील कापुस, शहादेव श्यामराव कणके यांच्या शेतातील सोयाबीन, कल्याण श्यामराव कणके यांच्या शेतातील मोसंबी पिकाची तर रेणापुरी या गावातील शेतकरी कृष्णा कांतराव कनके यांच्या शेतातील ऊस पिकाची पहाणी करुन झालेल्या नुकसानीची माहितीही पालकमंत्र्यांनी यावेळी जाणुन घेतली.

यावेळी पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, गेल्या चार पाच दिवसापुर्वी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने झाल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सुचना प्रशासनास दिल्या आहेत.  अतिवृष्टीने या भागातील सोयाबीन, कापुस, तुर, मुग, ऊस तसेच द्राक्ष, मोसंबी, डाळींब या फळपीकांचेही मोठे नुकसान झाले आहे. विमा कंपनीच्या प्रतिनिधींना झालेल्या नुकसानीची पहाणी करुन तसा अहवाल कंपनीला पाठविण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.  परंतु शेतकऱ्यांनी जागरुक राहणे गरजेचे असल्याचे सांगत ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टीने शेतपीकांचे, फळपिकांचे नुकसान झाले आहे त्याची माहिती विमा कंपनीला देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 अतिवृष्टीने शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.  या पाण्याचा निचरा न झाल्यानेही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असुन  पाण्याचा निचरा होण्यासाठी मेकॅनिकल विभागाने त्यांच्याकडे असलेल्या पोकलॅनच्या सहाय्याने पाण्याचा निचरा होण्यासाठी काम तातडीने हाती घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

*******

No comments:

Post a Comment