Monday 8 June 2020

जिल्ह्यात सहा व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह तर आठ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती


जालना दि. 8 (जिमाका) :जिल्हा सामान्य रुग्णालयातुन  खापरदेव हिवरा ता. घनसावंगी येथील तीन, जालना शहरातील ढोरपुरा येथील एक, साईनगर जालना येथील एक, मठपिंपळगाव ता. अंबड येथील एक, नानसी पुनर्रवसन येथील एक, डोलारा ता. परतुर येथील एक, असे एकुण 8 कोरोनाबाधित रुग्णावर यशस्वी उपचार करुन व त्या सर्वांच्या दुस-या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.  तसेच दि. 8  जुन 2020 रोजी सहा  व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.
        पॉझिटिव्ह सापडलेल्या व्यक्तींमध्ये  जालना शहरातील  लक्ष्मीनारायणपुरा येथील 69 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय पुरुष, 47 वर्षीय, 17 वर्षीय तरुणी, 50 वर्षीय महिला तर मंगळबाजार परिसरातील 17 वर्षीय तरुणी असे एकुण 6 व्यक्तींचा समावेश आहे.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण -3028असुन सध्या रुग्णालयात -79 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती -1185, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या - 82 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -3224, एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने 06 ,असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -205 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -2923, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-372, एकुण प्रलंबित नमुने -92, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1101,
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती 12, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती 998, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -69, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -527, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत33,  सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 79, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती -15, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-08, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या -122,  सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या- 73 (+ एक रेफर औरंगाबाद),(3 ॲडमिट एमजीएम औरंगाबाद) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 6318 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 05 एवढी आहे.  
            कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 527 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-23,  मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह -37, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-31, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना -210, कस्तुरबा गांधी बालिका वसतीगृह परतुर  -10, हिंदुस्थान मंगल कार्यालय,जाफ्राबाद-14, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-22, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे 42, अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी -24, मॉडेल स्कुल मंठा-41,कस्तुरबा गांधी बालिका वसतीगृह मंठा- 15, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -04, मॉडेल स्कुल अंबा रोड परतुर – 21, पंचगंगा मंगल कार्यालय जाफ्राबाद-33 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.
             लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 160 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 766 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 819 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली   3 लाख 22 हजार  30 असा एकुण 3 लाख 48  हजार  838 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment